भारताला २०२२ चा टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल तर या खेळाडूला संघात संधी द्या, रोहित शर्माला या दिग्गजाने दिला सल्ला..!

T-२० विश्वचषक २०२१ मधील पराभवानंतर बीसीसीआयने भारतीय संघ पूर्णपणे बदलला आहे. कोहली-शास्त्री यांच्या ऐवजी आता रोहित-राहुलचे युग सुरू झाले आहे. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनला आहे. त्याचवेळी प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या देखरेखी खाली कठोर निर्णय घेत अलीकडे अनेक खेळाडू बाहेर फेकले गेले आहेत. यादरम्यान, महान फलंदाज सुनील गावस्कर याने कर्णधार रोहित शर्माला टी-२० विश्वचषक २०२२ चे विजेतेपद जिंकण्यासाठी मोठा सल्ला दिला आहे.

वेस्ट इंडिजनंतर भारतीय संघ श्रीलंके विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेवर लक्ष केंद्रित करत आहे. या सामन्यांमध्ये विराट कोहली, केएल राहुल आणि ऋषभ पंतसारखे वरिष्ठ फलंदाज भारतीय संघात नाहीत. अशा स्थितीत या खेळाडूंच्या जागी युवा खेळाडूंना सलामीच्या, मधल्या फळीत खेळण्याची संधी मिळणार आहे. विशेषत: कर्णधार आणि प्रशिक्षक संघात बॅकअप सलामीवीराच्या शोधात आहेत जो टी-२० विश्वचषकात संघासोबत असेल.

ईशान किशनला सलामीवीर म्हणून वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे आणि टी-२० सामन्यांमध्ये मिळालेल्या संधीचा फायदा उठवता आलेला नाही. अशा परिस्थितीत शेवटच्या टी-२० सामन्यात आयपीएल आणि देशांतर्गत स्पर्धेत दहशत निर्माण करणाऱ्या रुतुराज गायकवाडला संधी दिली जाऊ शकते, ज्याचे सुनील गावस्कर कौतुक करत आहे.

सामन्यानंतर स्टार स्पोर्ट्स वाहिनीशी बोलताना सुनील गावसकर म्हणाला, या मालिकेत एक गोष्ट स्पष्टपणे दिसत आहे की, इशान किशन पूर्ण आत्मविश्वासाने शॉटपिच चेंडू खेळत नाही. जेव्हा चेंडू त्याच्या टप्प्यात पडतो तेव्हा तो एक सुंदर शॉट मारतो. पण जर चेंडू शॉटपिच असेल आणि बाऊन्स घेऊन त्यांच्या दिशेने येत असेल तर तो अडचणीत येतो. सलामीवीर म्हणून तुम्हाला असे चेंडू नक्कीच खेळायला मिळतील. हे चेंडू तुम्ही आत्मविश्वासाने खेळले नाहीत, तर गोलंदाज त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.

तुम्ही मिशन मेलबर्नकडे अशा प्रकारची फलंदाजी पाहत असाल, तर हा मार्ग कठीण आहे. ऑस्ट्रेलियामध्ये चेंडू अधिक उसळी आणि वेगाने तुमच्या दिशेने येतो. निदान आता ईशान किशन ज्या प्रकारे अडचणीत येत आहे, ते तिथे अजिबात चालणार नाही. टीम इंडियाचा माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनी कर्णधार रोहित शर्माला सल्ला देताना एका खेळाडूचे नाव सुचवले आहे, त्याला संधी देऊन भारतीय संघ पुन्हा जगावर राज्य करू शकेल. रोहितने आपल्यासोबत रुतुराज गायकवाडचा सलामीवीर म्हणून वापर करावा, असे सुनील गावस्करचे मत आहे.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप