IPL २०२२ मध्ये या ५ खेळाडूंनी ठोकले सर्वात लांब षटकार, १९ वर्षीय खेळाडूचाही समावेश..!!

IPL २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने जोरदार विजेतेपद पटकावले आहे. हार्दकि पंड्या ने  त्याच्या टीमला पहिल्याच वर्षी चॅम्पियन बनवले, तसेच आयपीएलच्या १५ व्या मोसमात अनेक विक्रम मोडले गेले. त्याचवेळी या आयपीएलमध्ये काही खेळाडूंनी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. वास्तविक, IPL २०२२ मध्ये एक हजाराहून अधिक षटकार मारले गेले. या हंगामात खेळाडूंनी एकूण १०५४ षटकार मारले. यापैकी ५ षटकारांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. या षटकारांची लांबी पाहून सगळेच थक्क झाले. या हंगामातील (IPL२०२२ ) ५ सर्वात लांब षटकारांबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

लियाम लिव्हिंगस्टोन: आयपीएल २०२२ मध्ये, पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनने बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली आहे. पंजाब किंग्ज या मोसमातील टॉप-४ यादीतून भलेही बाहेर गेला असेल, परंतु संघाच्या या फलंदाजाने मोसमातील सर्वात लांब षटकारांसह अव्वल स्थानावर आपले नाव नोंदवले आहे. लिव्हिंगस्टोनने IPL २०२२ मध्ये ११७ मीटर चा  सर्वात लांब षटकार मारला.

टीम डेव्हिड : मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी यंदाच्या मोसमात खूपच खराब झाली आहे, मात्र या संघाच्या स्फोटक फलंदाज टीम डेव्हिडने आपल्या जीवघेण्या फलंदाजीने विरोधी संघांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. यासोबतच टीम डेव्हिडच्या नावावर या मोसमातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा षटकार आहे. त्याने टी नटराजनच्या चेंडूवर ११४ मीटरचा षटकार मारला.

IPL २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण करणाऱ्या १९ वर्षीय डेवाल्ड ब्रेविसने आपल्या पहिल्याच IPL मध्ये एक खास विक्रम केला. वास्तविक, ब्रेव्हिसने मोसमातील तिसरा सर्वात लांब षटकार मारला. त्याने राहुल चहरच्या चेंडूवर ११२ मीटरचा षटकार मारला.

लियाम लिव्हिंगस्टोन: आयपीएल २०२२ मध्ये, पंजाब किंग्जचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोनने बॅट आणि बॉलने अप्रतिम कामगिरी केली आहे. सर्वात लांब षटकार मारण्याच्या शर्यतीतही तो चौथ्या क्रमांकावर आहे. आयपीएल २०२२ मध्ये, पंजाब किंग्जच्या या अष्टपैलू खेळाडूने CSK गोलंदाज मुकेश चौधरीच्या चेंडूवर १०८ मीटरचा षटकार मारला.

निकोलस पूरन: सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरनची आयपीएल २०२२ मधील कामगिरीही उत्कृष्ट होती. बॅटने धावा करण्यासोबतच त्याने या मोसमातील पाचवा सर्वात लांब षटकारही ठोकला. या मोसमात पूरनने १०८ मीटरमध्ये षटकार ठोकला. त्याचा षटकार घातक वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाच्या चेंडूवर लागला.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप