तुम्हाला माहिती आहेच की, नुकतेच सेहवाग म्हणाला होता की या स्टार खेळाडूला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवायला हवे, राहुल आणि पंतला नाही, त्याने जे सांगितले ते आता खरे ठरले आहे, खरे तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि टी-२० भारतीय क्रिकेटच्या नव्या आंतरराष्ट्रीय कर्णधाराच्या आगमनाने वीरेंद्र सेहवागची भविष्यवाणी खरी ठरली चला तर मग जाणून घेऊ नेकम काय म्हणाला होता सेहवाग.
रोहित शर्माला भारताच्या टी-२० आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केल्यानंतर उपकर्णधाराच्या भूमिकेची चर्चा अजूनही सुरू आहे. केएल राहुल आणि ऋषभ पंत ही अशी नावे आहेत ज्यांची खूप चर्चा झाली आहे परंतु भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याच्या मनात आणखी एक नाव आहे ज्याला टी-२०आणि एकदिवसीय संघाचा उपकर्णधार बनवून जबाबदारी सोपवली जावी.
राहुल आणि पंत नाही तर या स्टार खेळाडूला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवायला हवे- सेहवाग
केएल राहुलला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये पंजाब किंग्जच्या कर्णधारपदाचा अनुभव आहे. दुसरं नाव म्हणजे ऋषभ पंत, ज्याची चर्चा सुरू आहे. या यष्टीरक्षक-फलंदाजाने आयपीएल २०२१ मध्ये दिल्लीचे कर्णधारपदही स्वीकारले आहे. केएल राहुल आणि सेहवाग यांच्याकडे कर्णधारपदाचा अनुभव असूनही, जसप्रीत बुमराह टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उपकर्णधार चर्चेत शीर्षस्थानी असावा असे त्यांना वाटते. आणि ते आता खरे ठरले आहे. त्याला वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे.
वीरेंद्र सेहवाग क्रिकबझमध्ये म्हणाला की, ‘तुम्ही तुमचा कर्णधार किंवा उपकर्णधार अशा व्यक्तीला बनवा जो तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतो. त्यामुळे तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये जसप्रीत बुमराहपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. अर्थात केएल राहुल आणि ऋषभ पंत हे पात्र आहेत पण ते तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळतील कि नाही हे माहित नाही, आणि जरी खेळले तरी ते जसप्रीत बुमराहप्रमाणे सातत्यपूर्ण कामगिरी करू शकतील का?
भारतीय क्रिकेट संघाकडे यापूर्वी संघाचे नेतृत्व करण्यासाठी वेगवान गोलंदाज नव्हता, असेही तो म्हणाला. अगदी कपिल देव हा एक अष्टपैलू खेळाडू होता तर अनिल कुंबळे हा फिरकीपटू होता ज्याने कसोटीत काही काळ संघाचे नेतृत्व केले होते. तथापि, सध्याची परिस्थिती पाहता, मला वाटते की उपकर्णधारपदासाठी बुमराह हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो.