KGF च्या तुफानासमोर सर्व बॉलीवूड झाले भुई सपाट, अवघ्या ४ दिवसात १००, २०० नाही तर इतक्या कोटींचा गल्ला जमवला..!

साऊथचे पुष्पा, आरआरआर यांसारखे तगडे पिक्चर सिनेमागृहात धुमाकूळ घालत असतानाच यात एका नव्या सिनेमाची वर्णी लागली आहे, साऊथ सुपरस्टार यशचा केजीएफ टू हा सिनेमा सध्या चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे! अवघ्या सुरुवातीच्या दोनच दिवसात जगभरात २७० कोटींची कमाई करणाऱ्या या सिनेमाने रविवार पर्यंत ५५० कोटी पेक्षाही जास्त बिझनेस करण्यात यश मिळवले आहे, टॉलीवूड आणि बॉलीवूड चित्रपटसृष्टीत केजीएफ 2 च्या रूपाने सुनामी बॉक्सऑफिसवर धडकली आहे अशी चर्चा रंगली आहे!

View this post on Instagram

A post shared by filmy Arena (@filmy__arena)

असेच  आरआरआर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पाहायला मिळाले होते, पण केजीएफ 2 ची सुनामी ही आरआरआर पेक्षाही विराट स्वरूपाचे असल्याचे चित्र सध्या दिसत आहे! एसएस राजमौली दिग्दर्शित आरआरआर या सिनेमाने काही दिवसांपूर्वी वर्ल्ड वाईट म्हणजे एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांची कमाई केली होती, अजूनही सिनेमागृहात आरआरआर सिनेमा गर्दी खेचतांना दिसतो. परंतु त्याच्या मागून आलेला केजीएफ 2 सिनेमाचा कमाईचा वेग पाहिला तर तो आश्चर्यचकित करणारा आहे! तब्बल चार दिवसात या चित्रपटाने पाचशे कोटींचा आकडा पार करून टाकला आहे!!

#KGFChapter2 WW Box Office

CROSSES ₹500 cr milestone mark in just 4 days.

Day 1 – ₹ 165.37 cr
Day 2 – ₹ 139.25 cr
Day 3 – ₹ 115.08 cr
Day 4 – ₹ 132.13 cr
Total – ₹ 551.83 cr

#2 at the global box office after fantastic beasts.

भारतातही केलीये बक्कळ कमाई!!

View this post on Instagram

A post shared by Aaj Tak (@aajtak)

केजीएफ या चित्रपटाने भारतात प्रचंड धमाका केला आहे. केजीएफ 2 च्या हिंदी वर्जनचे आकडे ही सामान्य माणसाला थक्क करणारे ठरत आहेत! अवघ्या तीनच दिवसात केजीएफ 2 च्या हिंदी वर्जनने १४३.६४ कोटींची कमाई केली आहे. तर कालच्या रविवारी या चित्रपटाने ५०.३५ कोटींचा बिझनेस केलाय.

केजीएफ या सिनेमाने हिंदीत सलग चार दिवसात चाळीस कोटींहून अधिक कमाई करण्याचा नवा विक्रम नोंदवण्यात यश मिळवले आहे! अवघ्या दोन दिवसात शंभरी पार करणारा हिंदीत रिलीज झालेला हा पहिलाच चित्रपट ठरला आहे. अगदी कमी म्हणजे फक्त चारच दिवसात केजीएफ 2 च्या हिंदी वर्जनने १९३.९९ कोटींचा गल्ला मिळवण्यात इतर चित्रपटांना मागे टाकले आहे! तर आज सोमवारी हा सिनेमा २०० कोटींचा आकडा देखील बघता-बघता पार करेल अशी अपेक्षा सिनेसृष्टीतील जाणकारांनी व्यक्त केली आहे. हा चित्रपट अनेक विक्रम मोडीत काढत आहे अजून किती आठवडे या सिनेमाला प्रेक्षकांचा असाच उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे!

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप