भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने ३१ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने २९६ धावा केल्या होत्या, त्याला प्रत्युत्तरात देताना भारतीय संघ केवळ २६५ धावाच करू शकला. यासह आता दक्षिण आफ्रिकेच्या संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिका संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने संघाकडून कर्णधारपदाची खेळी खेळली. त्याने १४३ चेंडूंत आठ चौकारांच्या मदतीने ११० धावा केल्या. बावुमाशिवाय रस्सी व्हॅन डेर ड्युसेननेही शतक झळकावले. डुसेनने ९६ चेंडूत १२९ धावा केल्या, यादरम्यान डुसेनने संघासाठी ९ चौकार आणि ४ षटकार ठोकले संघासाठी दणदणीत खेळी केली. बावुमा आणि डुसेनच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघासमोर २९६ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले.
भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक विकेट घेतल्या, दक्षिण आफ्रिकेकडून बुमराहने ४८ धावा देत २ बळी घेतले. बुमराहशिवाय फक्त अश्विनने एक विकेट घेतली.
विजयासाठी २९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि ४६ धावांवर संघाने कर्णधार केएल राहुल (१२ )ची विकेट गमावली. त्यानंतर विराट कोहली (५१) आणि शिखर धवन (७९) यांनी संघासाठी अर्धशतके झळकावली. त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी मिळून ९२ धावांची भागीदारी केली. पण शिखर धवन बाद झाल्यानंतर संघाला सावरता आले नाही आणि सतत विकेट्स गमावल्याने सामना ३१ धावांनी गमवावा लागला. भारतीय संघासाठी शार्दुल ठाकूरनेही अर्धशतक ठोकले, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जेन्सन वगळता सर्व गोलंदाजांनी विकेट घेतल्या. लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी आणि फेलुकवायो यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. मरकाम आणि केशव महाराज यांनीही भारतीय संघाच्या प्रत्येक फलंदाजाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. भारताने सुद्धा सुरवातीला चांगली कामगिरी केली परंतु शिखर धवन च्या विकेट नंतर गळती लागलीआणि संघ सावरू शकला नाही.
बुमराहने ४८ धावा देत २ बळी घेतले परंतु बाकीचे गोलंदाज काही चांगली कामगिरी करू शकले नाहीत. बावुमा आणि डुसेनच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघासमोर २९६ धावांचे कठीण लक्ष्य ठेवले, आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भारत अपयशी ठरला.