IPL च्या पहिल्या सीज़न मध्ये या पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी केला होता धमाल, जाणून घ्या किती रुपयांना खरेदी केले होते आफ्रिदी आणि अख्तर..!

पाकिस्तानी खेळाडू इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) भाग नाहीत. पण एक काळ असा होता जेव्हा हे खेळाडू जगातील सर्वात लोकप्रिय लीग मध्ये ही खेळायचे. आयपीएल २००८ मध्ये सुरू झाले आणि त्याच्या पहिल्या सत्रात अनेक पाकिस्तानी खेळाडू वेगवेगळ्या फ्रँचायझींसाठी खेळले होते. त्यानंतर मुंबईत दहशतवादी हल्ले झाले आणि भारत आणि पाकिस्तानचे संबंध बिघडले. यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडूंना लीग मध्ये सहभागी होण्यापासून रोखले आणि फ्रँचायझीनेही त्यांच्या संघात पाकिस्तानी क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात रस दाखवला नाही. पाकिस्तानी क्रिकेटपटू फक्त IPL २००८ मध्येच भाग घेऊ शकले होते. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ पाकिस्तानी खेळाडूंबद्दल सांगत आहोत, ज्यांनी पहिल्या सत्रात धमाल केली होती.

१) पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर पहिल्या सत्रात इंडियन प्रीमियर लीगचा भाग होता. शोएब अख्तर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. त्याने ३ सामने खेळले ज्यात त्याने ५ विकेट घेतल्या होत्या. आयपीएल २००८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध च्या सामन्यात त्याची शानदार गोलंदाजी आयपीएल चाहत्यांसाठी संस्मरणीय ठरली होती. शोएब अख्तरला KKR ने १.७ कोटी रुपयांना विकत घेतले होते.

२) शोएब मलिक आयपीएलच्या पहिल्या सत्रात खेळला आहे. शोएब मलिक आयपीएल २००८ मध्ये दिल्ली संघाचा भाग होता. पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने आयपीएलमध्ये ७ सामने खेळून ५२ धावा केल्या होत्या. त्याची सरासरी १३ आणि त्याचा स्ट्राइक रेट ११०+ होता. गोलंदाजीसोबतच मलिकने काही विकेट्सही घेतल्या होत्या. मलिकला दिल्लीने दोन कोटी रुपयांना विकत घेतले होते.

३) पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा वर्तमान मुख्य प्रशिक्षक, मिसबाह-उल-हक हे देखील IPL २००८ चा भाग होता. उजव्या हाताचा फलंदाज इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळला होता. मिसबाहने ८ सामने खेळले ज्यात त्याने ११७ धावा केल्या होत्या. मिसबाह-उल-हकला ५०.२० लाख रुपयांना विकत घेतले होते.

४) माजी पाक क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी देखील IPL २००८ चा भाग होता. आफ्रिदी इंडियन प्रीमियर लीगच्या उद्घाटनाच्या आवृत्तीत डेक्कन चार्जर्सकडून खेळला होता. पाकिस्तानचा माजी कर्णधार आफ्रिदीने १० सामने खेळले होते. त्याचा स्ट्राइक रेट १७६+ होता आणि स्पर्धेतील त्याची सर्वोच्च धावसंख्या ३३ होती. या मोसमात त्याने ९ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याला डेक्कन चार्जर्स ने पहिल्या सत्रात २.७१ कोटींना विकत घेतले होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप