इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत BCCI ला आला राग, तर या वेगवान गोलंदाजाची संघातून केली हकालपट्टी…!

BCCI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना 25 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आजपासून सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सामन्याच्या नाणेफेकीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक, बीसीसीआयने स्टार वेगवान गोलंदाजाला संघातून काढून टाकले आहे.

बीसीसीआयने आवेश खानला केले बाहेर:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू झाली आहे. पहिला सामना 25 जानेवारी ते 29 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल, तर या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 7 मार्च ते 11 मार्च दरम्यान खेळवला जाईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीकोनातून ही कसोटी मालिका खूप महत्त्वाची आहे.

 

या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक बीसीसीआयने आवेश खानला सोडले आहे. होय, इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून त्यात आवेश खानच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. पण पहिल्या सामन्याच्या नाणेफेकीनंतर बीसीसीआयने आवेशला सोडून दिले आहे.

आवेश खान या कारणामुळे केले बाहेर: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आपल्या अधिकृत X हँडलद्वारे आवेश खानच्या सुटकेची माहिती दिली आहे. एक्सवर माहिती देताना बीसीसीआयने सांगितले की, आवेश खानला रणजी ट्रॉफीमध्ये त्याच्या संघाच्या वतीने सहभागी होण्यासाठी सोडण्यात आले आहे. आवेश खान मध्य प्रदेश संघाचा एक भाग आहे आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या रणजी सामन्यासाठी बीसीसीआयने त्याला सोडले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top