गाबा टेस्टमध्ये रोहित शर्माला या कारणाने आला होता शार्दुल ठाकूरचा राग, रहाणेने सांगितले संपूर्ण प्रकरण..!!

भारतीय खेळाडू शार्दुल ठाकूर हा गोलंदाज मानला जातो पण अनेक प्रसंगी त्याच्या फलंदाजीनेही भारतासाठी सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे काम त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये अनेकदा केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या दौऱ्यांवर त्याने अनेक शानदार खेळी खेळल्या आणि आपल्या संघाला अडचणीत आणले. गाबा येथे भारताच्या संस्मरणीय विजयातही त्याने आपल्या बॅटचे दर्शन घडवले आणि ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्यापासून रोखले. त्याने चमकदार अर्धशतकी खेळी खेळली आणि यावेळी वॉशिंग्टन सुंदरसोबत महत्त्वपूर्ण भागीदारी केली.

मात्र, या सामन्यातील भारताच्या दुसऱ्या डावात शार्दुलने असे काही केले ज्यामुळे रोहित शर्माला त्याचा खूप राग आला होता. ३२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने काही धावांतच मयंक अग्रवाल आणि सुंदरचे विकेट गमावले. अशा परिस्थितीत जेव्हा शार्दुल ऋषभ पंतला साथ देण्यासाठी क्रीजवर आला तेव्हा भारताला फक्त १० धावांची गरज होती. ड्रेसिंग रूममधील प्रत्येकाची अपेक्षा होती की शार्दुल आणि पंत भारताला अंतिम रेषेपर्यंत नेतील परंतु उजव्या हाताच्या फलंदाजाने खराब शॉट खेळला आणि २ धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर त्याची विकेट गमावली.

वॉशिंग्टन बाहेर असताना शार्दुल ठाकूर आत जात होता. रोहितने त्याला ‘हीरो बनण्याची तुझी संधी आहे’ असे सांगितले. आणि त्याने फक्त होकार दिला आणि निघून गेला.
यानंतर अश्विन पुढे म्हणाला, तो निघणार इतक्यात रोहित म्हणाला, “शार्दुल, संपव”. नेमकं त्याचं म्हणणं शार्दुलला पूर्ण समजलं होत.  धोनीने सिक्स मारून वर्ल्ड कप जिंकला होता तो क्षण सारं काही शार्दुलच्या मनात धावत होतं. शार्दुलने शॉर्ट स्क्वेअर लेगवर मोठा फटका खेळला आणि तो बाद झाला. ड्रेसिंग रूममधील प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला.

यानंतर जेव्हा शार्दूल  ड्रेसिंग रूम मध्ये परतला तेव्हा रोहित खूप संतापलेला तो म्हणाला मी तुला हिरो बनण्याची संधी दिली होती पण तू ती संधी गमावली. आणि तिथून निघून घेला. हे सर्व प्रकरण रहाणेने एक न्युचॅनशी बोलताना सांगितले.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप