क्रिकेटच्या इतिहासात ६ चेंडूत ६ षटकार ठोकणारे हे ५ खेळाडू, या यादीत दोन भारतीय फलंदाजांचाही आहे समावेश..!

जगभरातील लोक क्रिकेट चा खेळ मोठ्या आवडी ने पाहतात. आपला आवडता खेळाडू मैदाना वर षटकार आणि चौकारांचा वर्षाव करतो तेव्हा हा खेळ आणखीनच आनंददायी होतो. क्रिकेट च्या इतिहासात प्रत्येक फलंदाजा ने मैदानात अनेक वेळा चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला असला तरी, असे फार कमी फलंदाज असतील ज्यांनी एकाच षटकात सलग ६ षटकार मारून सर्वांना चकित केले असेल. आज या लेखात आपण अशाच काही फलंदाजां बद्दल बोलणार आहोत ज्यांनी ६ चेंडूत ६ षटकार ठोकले आहेत.

गारफील्ड सोबर्स
गारफिल्ड सोबर्सला गॅरी सोबर्स या नावाने ओळखले जाते. वेस्ट इंडिजचा हा दिग्गज ६ चेंडूत ६ षटकार मारणारा पहिला खेळाडू आहे. क्रिकेटच्या इतिहासात त्याने एक वेगळी ओळख निर्माण केली होती. १९६८ मध्ये नॉटिंगहॅम शायर साठी काउंटी क्रिकेट मध्ये त्याने ग्लॅमॉर्गनचा गोलंदाज माल्कम नॅशकडून ५ चेंडूत ५ षटकार मारले होते, सहाव्या चेंडू वर सोबर्स च्या सीमारेषेवर झेलबाद झाला होता, परंतु कॅचरचा पाय सीमारेषेला लागला होता, त्यामुळे त्या बॉलला षटकार घोषित करण्यात आला आणि अशा प्रकारे ६ चेंडूत ६ षटकार ठोकणारा गॅरी सोबर्स हा क्रिकेट जगतातील पहिला खेळाडू ठरला होता.

रवी शास्त्री
टीम इंडियाचा माजी स्टार फलंदाज रवी शास्त्री १९८५ मध्ये रणजी ट्रॉफी मध्ये ६ चेंडूत ६ षटकार मारणारा दुसरा खेळाडू ठरला होता. गॅरी सोबर्सच्या १७ वर्षांनंतर त्याने हा पराक्रम केला होता. रणजी ट्रॉफी दरम्यान मुंबई साठी बडोद्या विरुद्ध गोलंदाज टिळक राज च्या षटकात शास्त्रींनी ६ चेंडूत ६ षटकार मारले होते.

हर्शेल गिब्स
दक्षिण आफ्रिकेचा माजी घातक फलंदाज हर्शल गिब्स २००७ च्या विश्वचषका दरम्यान नेदरलँड्स विरुद्ध ६ चेंडूत ६ षटकार मारणारा तिसरा खेळाडू ठरला होता. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये हा पराक्रम करणारा हर्षल गिब्स हा पहिला खेळाडू होता ज्याने आयसीसीच्या या मोठ्या स्पर्धेत हा पराक्रम केला होता. गिब्सने नेदरलँडचा गोलंदाज व्हॅन बनजेच्या षटकात ६ षटकार मारले होते.

युवराज सिंग
टीम इंडियाचा धडाके बाज फलंदाज युवराज सिंगने २००७ टी-२० विश्वचषका दरम्यान इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार मारून इंग्लंडच्या कॅम्प मध्ये खळबळ उडवून दिली होती.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप