‘दे धक्का’च्या रिमेक मध्ये सायलीच्या भूमिकेत गौरी वैद्य च्या जागी दिसणार हि सुंदर परी ..!

२००८ च्या सुमारास दे धक्का या मराठी चित्रपटाने सिनेसृष्टीत धमाल उडवून दिली होती. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, मेधा मांजरेकर अशा दिग्गज कलाकारांचा समावेश असल्याने हा विनोदी चित्रपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला होता!! आता या बहुचर्चित धमाल विनोदी चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच भाग दोन येत असून मोशन पोस्टर सोबत या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख हे जाहीर करण्यात आली आहे. दे धक्का 2 मधील सायलीची भूमिका मात्र दुसरीच कोणती अभिनेत्री साकारताना दिसणार आहे…

दे धक्का या सिनेमात गोड सायलीची भूमिका लक्षवेधी ठरलेली. अभिनेत्री गौरी वैद्य हिने ही भूमिका निभावली होती. परंतु गौरी सध्या अभिनय क्षेत्रामध्ये सक्रिय नसल्याचे समजते. आता ती २६ वर्षाची झालेली असून मुंबईतील माटुंगा येथील डी जी रुपारेल कॉलेजमधून शिक्षण घेतल्यावर तिने इंजीनियरिंग अँड कॉम्प्युटर टेक्नोलॉजी या विषया मधून पदवी घेतलेली आहे. या सिनेमाच्या सिक्वेल मध्ये सर्व कलाकार आहेत फक्त गौरी वैद्य ऐवजी गौरी इंगवले दिसणार आहे!

दे धक्का 2 हा सिनेमा ५ ऑगस्टला रिलीज होणार आहे। या चित्रपटाच्या मोशन पोस्टर समवेत यातील सर्व कलाकारांची ओळख करून देण्यात आली आहे. गौरी इंगवले ही मेघा मांजरेकर यांच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी आहे, त्यामुळे आपल्या मुलांप्रमाणे महेश मांजरेकर गौरीचा देखील सांभाळ करताना दिसत आहेत.

गौरी इंगवले हिने बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशी, सिद्धार्थ जाधव अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘कुटुंब’ या चित्रपटात गौरीने महत्त्वपूर्ण भूमिकेत बालकलाकार म्हणून काम केले आहे. तसेच ‘ओवी’ या नाटकात तिने मध्यवर्ती भूमिका साकारली होती आणि आता सगळ्यात शेवटी ती ‘पांघरून’ या सिनेमातून झळकलेली! या सिनेमातील तिने साकारलेल्या भूमिकेमुळे तिच्या कामाची सर्वत्र दखल घेत प्रेक्षकांकडून भरपूर प्रशंसाही करण्यात आलेली!

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप