तिसऱ्या T-२० सामन्यात रोहित शर्मा या कारणामुळे डगआउट मध्ये परतला..!

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मंगळवारी वेस्ट इंडिज विरुद्ध च्या तिसऱ्या T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात दुखापतग्रस्त होऊन डगआउट मध्ये परतला होता. रोहित शर्मा जेव्हा डगआउट मध्ये परतला तेव्हा तो ५ चेंडूत एका चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ११ धावा वर खेळत होता. रोहित शर्मा खेळपट्टीवर अस्वस्थ दिसत होता आणि फिजिओ त्याच्या उपचारा साठी मैदाना वर आला होता. फिजिओ सोबत प्रदीर्घ संभाषणा नंतर रोहित शर्मा ने मैदान सोडण्याचा निर्णय घेतला आणि हे पाहून चाहते आश्चर्यचकित झाले होते.

भारतीय संघाच्या फिजिओने रोहित शर्मा बद्दल अपडेट दिले आहे की त्याला पाठदुखीचा त्रास होत आहे, त्यामुळे त्याने दुखापती मुळे डगआउट मध्ये परतण्याचा निर्णय घेतला होता. काही वेळा नंतर बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल द्वारे रोहित शर्माला पाठदुखी असल्याची पुष्टी केली आहे. त्याच्या वर बीसीसीआयचे वैद्यकीय पथक लक्ष ठेवून असल्याची माहिती बोर्डाने दिली. आता रोहित शर्मा शनिवार आणि रविवारी वेस्ट इंडिज विरुद्ध च्या चौथ्या आणि पाचव्या T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात उपलब्ध राहण्यास सक्षम आहे की नाही हे पाहावे लागेल. रोहित शर्मा च्या जागी श्रेयस अय्यर फलंदाजीला आला होता.

भारतीय संघ तिसऱ्या T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १६५ धावांचा पिच्छा करत होता. रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाल्याचं दडपण भारतीय संघावर अजिबात दिसल नाही. भारतीय संघाने सूर्यकुमार यादव च्या दमदार खेळी मुळे भारतीय संघाने हा सामना एकोणिसाव्या शतकात जिंकला. सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूत ७६ धावांची तुफानी फलंदाजी केली होती.

रोहित शर्मा दुसऱ्या T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात गोल्डन डक वर बाद झाला होता. यासह त्याच्या नावा वर हा लज्जास्पद विक्रम नोंदवला गेला आहे. रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्या मध्ये सर्वाधिक गोल्डन डक वर बाद होणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहित शर्मा पहिल्याच चेंडू वर बाद होण्याची ही चौथी वेळ होती. याशिवाय रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्या मध्ये गोल्डन डक वर बाद होणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी, शिखर धवन २०२१ मध्ये श्रीलंके विरुद्ध च्या तिसऱ्या T-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खाते न उघडता बाद झाला होता. आता रोहित शर्माही या नको असलेल्या क्लबचा भाग झाला आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप