अलीकडेच इंग्लंड संघाला दक्षिण आफ्रिके विरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. इंग्लंडचा संघ भलेही फ्लॉप ठरला असेल पण दुसरीकडे इंग्लंडच्या एका खेळाडूने आपल्या कामगिरीने सर्वांनाच चकित केले आहे. इंग्लंड मध्ये काउंटी चॅम्पियनशिप सुरू असताना डिव्हिजन २ मधील नॉटिंगहॅ मशायर आणि डर्बीशायर यांच्यातील सामन्यात असे काही पाहायला मिळाले जे यापूर्वी क्वचितच घडले असेल.
या सामन्यात एका भारतीय आणि एका इंग्लिश फलंदाजाने मिळून जुना विक्रम मोडला आहे. काउंटी चॅम्पियनशिप मध्ये या दोन फलंदाजांच्या जोडीने १०० वर्ष जुना विक्रम मोडीत काढत दहशत निर्माण केली आहे. बेन डकेट आणि हसीब हमीद यांनी मिळून ४०२ धावांची अप्रतिम भागीदारी इतिहासाच्या पानात नोंदवली गेली आहे. भारतीय वंशाचा हमीद आणि इंग्लंडच्या बेन डकेटने दुसऱ्या विकेट साठी ४०२ धावांची भागीदारी केली आहे. हमीदने १९६ तर बेनने २४१ धावांची शानदार खेळी केली आहे.
View this post on Instagram
डर्बीशायर विरुद्ध नॉटिंगहॅमशायरची ही कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. २००१ मध्ये केविन पीटरसन आणि जॉन मॉरिस यांच्यात ३७२ धावांची भागीदारी झाली होती. यासह डर्बीशायर विरुद्ध दुसऱ्या विकेट साठी कोणत्याही संघाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम १९०० मध्ये वॉरविकशायरच्या जॅक डेवी आणि सेप्टिमस यांनी केला होता. दोघां मध्ये ३४४ धावांची भागीदारी झाली होती.
हमीदने ३२८ चेंडूंचा सामना करत २४ चौकार आणि १ षटकार ठोकला होता. प्रथम फलंदाजी करताना नॉटिंगहॅमशायरने हमीद आणि बेन च्या दमदार भागीदारी मुळे ८ विकेट गमावून ६१८ धावांची मोठी धावसंख्या उभारून डाव घोषित केला होता. नॉटिंगहॅमशायरने ४६ धावांवर पहिली विकेट गमावली होती. पण यानंतर बेन आणि हमीदने मिळून डावाचा ४०० धावांचा टप्पा पार केला. लियाम व्हाईटने ५४ आणि जेम्स पॅटिन्सनने नाबाद ४५ धावा केल्या होत्या.
हमीदचे कुटुंब भारतातील गुजरातचे आहे, जे काही वर्षांपूर्वी इंग्लंड मध्ये स्थायिक झाले होते. हमीदच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दी बद्दल सांगायचे तर, त्याने २०१६ मध्ये राजकोट येथे भारता विरुद्ध च्या कसोटी सामन्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये प्रवेश केला होता. बेन डकेटचा जन्म १७ ऑक्टोबर १९९४ रोजी इंग्लंड मध्ये झाला होता. तो एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू आहे जो इंग्लंडच्या राष्ट्रीय क्रिकेट संघा कडून खेळतो. देशांतर्गत क्रिकेट मध्ये तो काउंटी चॅम्पियनशिप मध्ये नॉटिंगहॅमशायर कडून खेळतो.