आशिया कपसाठी भारत झाला आहे सज्ज, अखेर फॅन्स च्या प्रतीक्षेनंतर समोर आली फायनल टीममधील खेळाडूंची नावे..!!

आशियाई क्रिकेट संघांमधील सर्वात मोठी स्पर्धा आशिया कप २०२२ साठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाच्या आशिया कप संघाची प्रतीक्षा होती, अखेर सोमवारी त्याची घोषणा करण्यात आली.  भारतीय क्रिकेट संघाच्या निवडकर्त्यांनी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली १५ जणांचा संघ जाहीर केला. या संघात काही खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे, तर काही खेळाडूंना बाहेरचा रस्ताही दाखवण्यात आला आहे. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहसारखे मोठे नाव दुखापतीमुळे आशिया चषकात दिसणार नाही.

गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेट संघाच्या ओपनिंग कॉम्बिनेशनमध्ये सतत बदल होत आहेत. पण अखेर आता आशिया चषकात संतुलित आणि मजबूत सलामीची जोडी पाहायला मिळणार आहे. येथे काही काळ दुखापतग्रस्त असलेल्या केएल राहुलने पुनरागमन केले आहे. केएल राहुलचे संघात पुनरागमन झाल्याने तो रोहित शर्मासह डावाची सुरुवात करणार आहे. भारतीय संघ पाहिल्यानंतर, प्रत्येकाच्या मनात या स्पर्धेसाठी भारताची सर्वात मजबूत प्लेइंग इलेव्हन जाणून घेण्याचा प्रश्न आहे. चला तर मग जाणून घेऊयात भारताचा संघ.

सलामी – केएल राहुल आणि रोहित शर्मा: भारतासाठी आतापर्यंत राहुल आणि रोहितच्या जोडीने सलामीची जोडी म्हणून मोठा विक्रम केला आहे. अशा परिस्थितीत ही सलामीची जोडी भारतासाठी खूप मजबूत असेल.  येथे काही काळ दुखापतग्रस्त असलेल्या केएल राहुलने पुनरागमन केले आहे आणि तो आता नव्याने सुरवात करणार आहे.

आशिया चषकासाठी भारतीय संघाच्या ताकदीचे सर्वात मोठे कारण विराट कोहली आहे. माजी कर्णधार विराट कोहली काही काळ दूर होता, त्यानंतर तो येथे पुनरागमन करत आहे. विराट कोहली नंबरवर खेळताना दिसणार आहे. कोहली फॉर्ममध्ये नसला तरी त्याची उपस्थिती विशेष आहे. याशिवाय मधल्या फळीत सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंतही असतील. दोन्ही फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत, त्यामुळे भारताची मधली फळी चांगलीच दिसत आहे.

अष्टपैलू खेळाडू- हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा:  अष्टपैलू खेळाडू कोणत्याही संघासाठी विशेष समतोल प्रदान करतात. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा आशिया चषकात भारतीय संघासाठी असेच काहीसे करतील. हे दोन्ही खेळाडू बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत हुशार आहेत. खालच्या मधल्या फळीत फलंदाजीत उपयुक्त योगदान देण्याबरोबरच हे दोन्ही खेळाडू गोलंदाजीतही हात आजमावतील.

गोलंदाज- भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, रविचंद्रन अश्विन: जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेत खेळणार नसल्यामुळे भुवनेश्वर कुमार गोलंदाजीचे नेतृत्व करेल. यावेळी अर्शदीप सिंग भुवनेश्वर कुमारला साथ देऊ शकतो. दोघेही उत्कृष्ट स्विंग गोलंदाज आहेत. याशिवाय युझवेंद्र चहल आणि आर अश्विन फिरकी गोलंदाजीची जबाबदारी पार पाडतील. अशा परिस्थितीत हे 4 सर्वोत्तम गोलंदाज भारताकडून खेळताना दिसणार आहेत. या सर्व खेळाडूंमुळे भारतीय संघ खूप मजबूत दिसत आहे.

टीम इंडियाची संपूर्ण टीम
रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, आवेश खान, दीपक हुडा, रवी बिश्नोई

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप