कसोटी क्रिकेटमध्ये ५० सामन्यांमध्ये २५१ बळी घेण्याचा विश्वविक्रम आर अश्विनच्या नावावर आहे. जो आजपर्यंत कोणीही हा विक्रम मोडू शकलेले नाही. हा विक्रम करणाऱ्या रविचंद्रन अश्विनने आपल्या गोलंदाजीतून भारतीय क्रिकेट संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
गोलंदाजी करताना त्याने भारतीय लोकांच्या हृदयात अशी छाप सोडली आहे. ज्यामुळे तो खूप लोकप्रिय आहे. फलंदाजी सोबतच गोलंदाजी करताना अष्टपैलूची भूमिका बजावली होती. त्यामुळे तो सध्या गोलंदाजीसोबतच अष्टपैलू म्हणून ओळखला जातो. एवढेच नाही तर रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वात जलद ४०० विकेट घेणारा जगातील दुसरा आणि भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे.
भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर माजी भारतीय फलंदाज संजय मांजरेकर याने अनेक खेळाडूंवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या खेळाडूंच्या यादीत रविचंद्रन अश्विनचा क्रमांक लागतो. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी अश्विनच्या निवडीवर मांजरेकर याने प्रश्न उपस्थित केले आहेत. आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये अश्विनखूप स्लो दिसला आणि यामागचे एक कारण हे असू शकते की त्याने पाच वर्षानंतर पहिला एकदिवसीय सामना खेळला होता.
पहिल्या वनडेत अश्विनने ५३ धावांत १ बळी घेतला आणि फलंदाजीत फक्त ७ धावा केल्या. त्याच वेळी, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो एकही बळी घेऊ शकला नाही आणि दहा षटकांत त्याने ६८ धावा दिल्या. भारताने पहिले दोन सामने गमावल्यानंतर मालिकेतील शेवटच्या सामन्यासाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती.
ESPNcricinfo वर बोलताना मांजरेकर म्हणाला, ‘अश्विन अचानक भारताच्या वनडे टीम मध्ये परत आला आणि भारताने त्याची किंमत चुकवली. त्याने दोन महत्त्वाचे सामने खेळले पण फार काही खास कामगिरी केली नाही. (युजवेंद्र) चहलवरही प्रश्न उपस्थित होतील. प्रसिद्ध कृष्णाला अजून थोडा वेळ देण्याची गरज आहे. तसेच ५० षटकांमध्ये मोहम्मद शमी हा चांगला पर्याय असू शकतो.
आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीची कामगिरी लोकांसमोर ठेवल्यामुळे, त्याने जून २०१० मध्ये श्रीलंकेच्या संघाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. जिथे त्याला गोलंदाजीसोबतच फलंदाजीचीही संधी मिळाली होती. १ आठवड्यानंतर, त्याने १२ जून २०१० रोजी झिम्बाब्वे क्रिकेट संघाविरुद्ध T-२० पदार्पण केले होते. जिथे त्याने आपल्या सर्वोत्तम कामगिरीचा फॉर्म चालू ठेवला आणि या चांगल्या कामगिरीमुळे त्याने ६ नोव्हेंबर २०११ मध्ये वेस्ट इंडिज क्रिकेट संघाविरुद्ध आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती.