महिला आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय महिला क्रिकेट संघ आणि श्रीलंकेचा महिला संघ यांच्यात बांगलादेशच्या सिल्हेट क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने २० षटकांत ९ गडी गमावून ६५ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय महिला संघाने ९ चेंडू शिल्लक असताना ८ गडी राखून सामना जिंकला. आणि ऐतिहासिक ट्रॉफी आपल्या नावावर केली.
वास्तविक, ६६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली. संघाची सलामीवीर शेफाली वर्मा ८ चेंडूत अवघ्या ५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर भारताला दुसरा धक्का जेमिमाह रॉड्रिग्जच्या (२२ धावा) रूपाने बसला.
View this post on Instagram
मात्र, यानंतर स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी भारताच्या विजयाच्या आशा कायम ठेवत संघाला विजय मिळवून दिला. हरमनने १४ चेंडूत ११ धावा केल्या, तर मानधनाने अर्धशतकी खेळी खेळली (५ चेंडू \ ५१ धावा). भारताने सातव्यांदा महिला आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले.