भारतीय संघाने मालिका जिंकून रचला इतिहास, पाकिस्तान संघाचा हा विश्वविक्रम मोडला..!

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चौथा T-२० सामना (फ्लोरिडा) टीम इंडियाने ५९ धावांनी विजय मिळवला होता. या विजयासह भारताने पाच सामन्यांची T-२० मालिका ३-१ अशी जिंकली आहे. विंडीजच्या कर्णधाराच्या फलंदाजीच्या आमंत्रणा वर टीम इंडियाने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या ४४ धावा आणि कर्णधार रोहित शर्माच्या ३३ धावांच्या खेळी मुळे २० षटकात ५ बाद १९१ धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव १९.१ षटकात १३२ धावांवर आटोपला. यजमानां कडून निकोलस पूरन आणि रोव्हमन पॉवेल यांनी सर्वाधिक २४-२४ धावांचे योगदान दिले. अर्शदीपने तीन तर आवेश खान, अक्षर पटेल आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. वेस्ट इंडिज विरुद्ध च्या विजया नंतर भारतीय संघाने पाकिस्तानचा विश्वविक्रमही मोडीत काढला आहे.

वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक T-२० आंतरराष्ट्रीय सामने जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघाने चौथा T-२० जिंकून पाकिस्तानला मागे टाकले आहे. या सामन्या पूर्वी भारत आणि पाकिस्तान विंडीज विरुद्ध १५ -१५ विजय मिळवून संयुक्तपणे पहिल्या स्थाना वर होते. मात्र, चौथ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव करत टीम इंडियाने १६ वा विजय नोंदवत पाकिस्तानला मागे टाकले आहे. आकडेवारी नुसार, टीम इंडियाचा वेस्ट इंडिज विरुद्ध २४ सामन्या मधला हा १६ वा विजय आहे. वेस्ट इंडिजने २४ टी-२० सामन्यां पैकी ७ सामने जिंकले आहेत व एक सामना अनिर्णित राहिला आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानने वेस्ट इंडिज विरुद्ध २१ पैकी १५ टी-२० सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान संघ ३ सामन्यात पराभूत झाला तर ३ सामने निकाला शिवाय अनिर्णित राहिले होते. यानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ आहेत ज्यांनी कॅरेबियन संघा विरुद्ध १०-१० सामने जिंकले आहेत.

वेस्ट इंडिज विरुद्ध सर्वाधिक T-२० जिंकणारा संघ-
भारत – १६ विजय, पाकिस्तान – १५ विजय, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका – १० विजय, न्यूझीलंड, श्रीलंका – ८ विजय, ऑस्ट्रेलिया- ७ विजय.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप