भारतीय संघ मालिका जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर, चौथ्या टी-२० सामन्यात असा असेल कर्णधाराचा नवा प्लॅन..!!

वेस्ट इंडिज आणि भारत  यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२०मालिकेतील चौथा सामना ६ ऑगस्ट रोजी फ्लोरिडामध्ये खेळवला जाईल. या मालिकेत भारतीय संघ १ -२ ने आघाडीवर आहे. पहिला आणि तिसरा टी-२० सामना भारताने जिंकला तर दुसरा सामना विंडीजने जिंकला होता.

भारतीय संघाने चौथा टी-२० सामना जिंकल्याने मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध  भारतीय संघाची कामगिरी चांगली आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला होता पण दुसऱ्या सामन्यात भारताला विंडीजकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्याचवेळी तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने दमदार पुनरागमन करत पुन्हा एकदा विजयाचा झेंडा फडकवला. त्याचवेळी चौथ्या टी-२० सामन्यातही अशाच कामगिरीची अपेक्षा असेल. आवेश खानच्या जागी रोहित शर्मा गोलंदाजीत हर्षल पटेलला संधी देऊ शकतो.

View this post on Instagram

A post shared by Team India (@indiancricketteam)

ओबेड मॅकॉयच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी दुसऱ्या टी-२० मध्ये चमकदार कामगिरी केली होती . प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ १९.४ षटकांत १३८ धावांवर गारद झाला. यानंतर विंडीज संघाने १९.२ षटकात ५ बाद १४१ धावा केल्या आणि सामना ५ विकेटने जिंकला होता. या ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिज संघाने१ -१ अशी बरोबरी साधली.

शेवटच्या षटकात विंडीजला १० धावांची गरज होती. आवेश खानला ओव्हर देण्यात आली पहिलाच चेंडू नो बॉल टाकून त्यावर षटकार ठोकन्यात आला, आणि वेस्टइंडीजने विजय मिळवला. भुवनेश्वर कुमारची दोन षटके बाकी होती, पण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने भुवनेश्वरऐवजी आवेश खानकडे चेंडू सोपवला, त्यानंतर आवेशच्या मोठ्या चुकीमुळे भारताचा पराभव झाला.

शेवटच्या षटकात आवेश खानच्या चुकीचा बचाव करत रोहित म्हणाला, “आम्हाला माहित आहे की भुवनेश्वरने आमच्यासाठी हे केले आहे आणि त्याने सामने वाचवले आहेत, परंतु जोपर्यंत तुम्ही अशी षटके आवेश किंवा अर्शदीपला देत नाही, तोपर्यंत तुम्हाला कसे कळणार?” कि ते गोलंदाज अश्या परीस्थित कशी गोलंदाजी करतायत? तो फक्त सामना होता. या सर्व गोलंदाजांमध्ये कौशल्य आणि प्रतिभा आहे, परंतु आम्हाला त्यांचा पाठींबा हवा आहे.” त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा आता आजून एखादी नवीन चाल खेळण्याच्या मूड मध्ये दिसत आहे. आता हे पाहावे लाजेग ही चाल कितपत योग्य ठरेल.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप