भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात ऑगस्ट मध्ये होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. झिम्बाब्वे क्रिकेट साठी ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे. आता याबाबत अधिक माहिती समोर आली आहे. झिम्बाब्वे दौऱ्या साठी भारताचा नियमित संघ पाठवला जाणार नसल्याची पुष्टी बीसीसीआयच्या सूत्रांनी केली आहे. त्याऐवजी भारताचा ब संघ झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. याचा अर्थ टीम इंडियाच्या अनुभवी आणि सर्वोत्तम खेळाडूंना विश्रांती मिळणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या खेळाडूंना विश्रांती मिळेल. याच युवा खेळाडूंना झिम्बाब्वे विरुद्ध खेळण्या साठी पाठवले जाऊ शकते.
बीसीसीआय च्या सूत्रांनीही व्हीव्हीएस लक्ष्मण हे झिम्बाब्वे विरुद्ध टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असतील याची पुष्टी केली आहे. राहुल द्रविडला विश्रांती वर पाठवले जाईल. भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रका मुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. भारताचा ब संघ आयर्लंड विरुद्ध पाठवण्यात आला होता, तर इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या टी-२० मालिकेसाठी भारताचा अ आणि ब संघही जाहीर करण्यात आला होता. पहिल्या सामन्या साठी तोच संघ निवडण्यात आला जो आयर्लंड दौऱ्यावर गेला होता. तर भारताचा अ संघ शेवटच्या दोन सामन्यां साठी निवडला गेला होता.
India tour of Zimbabwe 2022.#Indvzim #Cricket #CricketTwitter #IndianTeam #BCCI #TeamIndia pic.twitter.com/RUibWARAm2
— Crictips (@CrictipsIndia) July 8, 2022
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. पहिला एकदिवसीय सामना १८ ऑगस्ट ला खेळवला जाणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना २० ऑगस्ट ला खेळवला जाणार आहे. तिसरा एकदिवसीय सामना २२ ऑगस्ट ला खेळवला जाणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्या पूर्वी भारताचा वेस्ट इंडिज दौराही आहे. जुलै महिन्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे, जी २२ जुलै पासून सुरू होईल आणि २७ जुलै रोजी संपणार आहे. २९ जुलै पासून ५ टी-२० मालिकेची सुरुवात होणार आहे.
टीम इंडिया ने शेवटचा झिम्बाब्वे चा दौरा २०१६ मध्ये एमएस धोनी च्या नेतृत्वा खाली केला होता. त्यानंतर ३ वनडे आणि ३ टी-२० सामने खेळले होते. यावेळी T-२० मालिकेचे सामने होणार नाहीत, कारण T-२० आशिया कप २७ ऑगस्ट पासून श्रीलंकेत प्रस्तावित आहे.