IPL मधील सर्वात अपयशी झालेले हे 3 खेळाडू, यादीत भारतीय खेळाडू आहेत सामील..!

जगातील सर्वात मोठी लीग म्हणून IPL सामन्यांकडे पाहण्यात येतं. या लीगमध्ये जगभरातील दिग्गज खेळाडू एकत्र खेळताना दिसतात. या लीगमध्ये युवा खेळाडूंनाही आपली उत्तम कामगिरी दाखवण्याची उत्तम संधी मिळत असते. या बहुचर्चित आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. यंदा आगामी काळात आयपीएलचा १५ वा हंगाम खेळवण्यात येणार आहे. दिनांक २६ मार्च रोजी पहिला चेन्नई विरुद्ध कोलकाता सामना खेळण्यात येणार आहे.

यंदा सर्वांची नजर युवा खेळाडूंवर राहणार आहे. मात्र एवढ्या मोठ्या लीगमध्ये आतापर्यंत तीन खेळाडू असे झाले अहेतप किंवा होते जे त्यांच्या कारकिर्दीत अपयशी ठरले आहेत. खरतर सुपर फ्लॉप खेळाडूंचा असा आदर्श कुणीही घेऊ नये अस वाटत. विशेष म्हणजे या काढण्यात आलेल्या यादीमध्ये भारतीय क्रिकेटपटूचंही नाव आहे. कोण आहेत हे खेळाडू? जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचत रहा!

सौरव गांगुली: टीम इंडियाचा एक यशस्वी कर्णधार म्हणून गांगुली यांच्याकडे पाहण्यात येतं. मात्र आयपीएलच्या या संग्रामात गांगुली यांना फार यश खेचून आणता आलं नाही. संपूर्ण आयपीएलमध्ये ते फक्त ५९ सामने खेळले आणि यात त्यांनी १३४९ धावा केल्या आहेत. आतापर्यंत ७ अर्धशतक त्यांच्या नावावर झाले आहेत.

चेतेश्वर पुजारा : कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विश्वासाने खेळणारा आणि फिटनेस मध्ये मजबूत खेळाडू म्हणून पुजाराकडे पाहिल्या जायचं. मात्र आता कसोटी क्रिकेटमध्येही पुजारा फॉर्ममध्ये खेळताना दिसत नाही. आयपीएलमध्ये देखील पुजाराला जास्त करून अपयशच मिळालं आहे. त्याला या सामन्यांमध्ये जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने केवळ ३० सामने खेळून ३९० धावा काढल्या आहेत.

टी २० क्रिकेट सामन्यामधील पुजाराचा रनरेट देखील फारच कमी ठरला आहे. पुजाराला २०२१ मध्ये चेन्नई संघात समाविष्ट करण्यात आलं होतं. मात्र २०२२ मध्ये तो चेन्नईकडून खेळणार नाही.

वसीम जाफर: भारतीय क्रिकेटमध्ये मोठं नाव कमावलेला क्रिकेटर म्हणजे वसीम जाफर. आयपीएलमध्ये मात्र त्याला म्हणावं तितके विशेष यश मिळवता आले नाही. यात त्याला केवळ ८ सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यामध्ये त्याने १३० धावा केल्या. व ८ सामन्यात त्याने १४ चौकार, ३ षटकार आणि १ अर्धशतक ठोकण्यात यश मिळवलं होतं.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप