IPL २०२२ एप्रिल पासून नव्हे तर मार्चपासून होणार सुरू, अंबानीच्या या हायटेक स्टेडियममध्ये होणार सामने..!

इंडियन प्रीमियर लीग (IPL) लिलाव (IPL २०२२ मेगा लिलाव) १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथील हॉटेल ITC Gardenia येथे आयोजित करण्यात आला होता. जुन्या आठ संघांनी लिलावापूर्वी एकूण २७ खेळाडूंना कायम ठेवले होते. याशिवाय लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांनी प्रत्येकी तीन खेळाडू जोडले, म्हणजे एकूण ३३ खेळाडू लिलावापासून दूर राहिले होते. या लिलावात इशान किशन (१५.२५ कोटी) सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. यादरम्यान, आयपीएल २०२२ संदर्भात एक मोठे अपडेट समोर येत आहे.

जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग (IPL) चा १५ वा सीझन पुढील महिन्याच्या अखेरीस सुरू होऊ शकतो आणि तो मे महिन्याच्या शेवटी संपण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) पुढील आठवड्यात IPL २०२२ चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करेल. त्याचवेळी, कोरोनामुळे, शेवटचा हंगाम यूएईमध्ये खेळला गेला होता, परंतु यावेळी बीसीसीआयला तो भारतातच सुरू ठेवायचा आहे. अशा परिस्थितीत, कोरोना विषाणूचा धोका टाळण्या साठी बीसीसीआय १५ व्या मोसमात लीग टप्प्यातील सर्व सामने महाराष्ट्रात आयोजित करण्याची तयारी करत आहे.

आयपीएल च्या गेल्या मोसमात, वेगवेगळ्या फ्रँचायझीं मध्ये कोरोनाच्या प्रवेशा मुळे स्पर्धा मध्यंतरी थांबवण्यात आली होती. त्याचे उर्वरित सामने आणि अंतिम सामने यूएई मध्ये खेळले गेले होते. अशा स्थितीत मागील हंगामातील चुका पासून धडा घेत बोर्ड यावेळी कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत नाही. आयपीएल २०२२ मधील सर्व ७० लीग सामने महाराष्ट्रातच आयोजित करेल. InsideSports च्या वृत्तानुसार, IPL (IPL २०२२) चा १५ वा सीझन २७ मार्चपासून सुरू होईल आणि त्याचा अंतिम सामना मे महिन्याच्या शेवटी खेळवला जाईल.

बीसीसीआय च्या अधिकाऱ्याचा असा विश्वास आहे की महाराष्ट्रातील संपूर्ण लीग टप्प्याच्या आयोजना मुळे खेळाडू आणि संपूर्ण संघ कर्मचारी विमान प्रवास टाळू शकतील, ज्यामुळे कोविड- १९ चा धोका कमी होईल. ज्या स्टेडियम मध्ये सामन्यांची चर्चा होत आहे, त्या स्टेडियम मध्ये रिलायन्स जिओ स्टेडियमचे ही नाव आहे. आयपीएल २०२२ च्या संभाव्य यादीमध्ये त्याचा समावेश करण्यात आला आहे तसेच या मैदानावर आयपीएल सामने खेळता येतील. हे स्टेडियम सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. सध्या हे स्टेडियम मुंबई इंडियन्सचे होम ग्राउंडही आहे.

BCCI ने IPL २०२२ साठी मुंबई, पुणे आणि अहमदाबादमधील सहा पैकी चार ठिकाणे निवडली आहेत परंतु Jio स्टेडियमला ​​ब्रॉडकास्ट टीमकडून मंजुरी मिळालेली नाही. IPL २०२२ चा प्लेऑफ आणि अंतिम सामना अहमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियम या जगातील सर्वोत्तम स्टेडियम वर खेळला जाण्याची शक्यता आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप