आयपीएल सुरू होण्याची क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. काही दिवसापूर्वी आयपीएल चा मेगा लिलाव संपला आहे हे सर्वांना माहीत आहे. ज्या मध्ये सर्व संघांनी आपल्या आवडत्या खेळाडूंचा संघामध्ये समावेश केला आहे. मात्र, यावेळी मेगा लिलावात अनेक धक्कादायक निर्णयही पाहायला मिळाले होते. पण मेगा लिलाव यशस्वी रित्या पार पडला होता.
या आयपीएल मध्ये बरेच बदल झाले आहेत. ही आयपीएल जबरदस्त असणार आहे. त्यामुळे चाहत्यां मध्ये चांगलीच उत्सुकता पाहायला मिळत आहे. कारण यावेळी दोन नवीन संघही आयपीएल मध्ये सहभागी झाले आहेत. यावेळची आयपीएल कशी पाहायला मिळणार हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. जिथे आधी ८ संघ पॉइंट टेबल वर होते. यावेळी १० संघ दिसणार आहेत. त्यामुळे आयपीएलचा आणखी थरार पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, यावेळ च्या मेगा लिलावात लखनौ आणि अहमदाबाद या दोन्ही नवीन आयपीएल संघांनी ज्या प्रकारे आपला जोम दाखवला आहे, ते पाहता हे संघ आयपीएल मध्ये कोणाहून ही कमी नसतील असे दिसत आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि आयपीएलचे मीडिया ब्रॉडकास्टर डिस्ने स्टार यांनी लीगच्या १५ व्या आवृत्तीच्या प्रारंभा बाबत भिन्न मत व्यक्त केले आहे. २७ मार्चपासून सुरू होणाऱ्या लीगबाबत माहिती मिळाल्या नंतर सुरुवातीला ब्रॉडकास्टर्सनी बीसीसीआयकडे २६ मार्चपासून लीग सुरू करण्याची मागणी केली होती. यामुळेच बोर्डाने अद्याप आयपीएल 2022 चे वेळापत्रक शेअर केलेले नाही.
आयपीएल मधील विविध स्त्रोता कडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रिकबझने सांगितले की, शनिवार २६ मार्चपासून लीग सुरू करण्याची आणि २७ मार्च रोजी डबल-हेडर करण्याची मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे, रविवार २७ मार्चपासून आयपीएल सुरू होत असेल, तर सोमवारी डबल हेडर होणे शक्य होणार नाही. कारण सुट्टीच्या दिवशी डबल हेडर आयोजित केले जातात आणि लॉन्चच्या दिवशी एकच सामना असतो.
या सामन्याच्या ठिकाणा बाबत बोर्डाने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. अशीही चर्चा आहे की, कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने अनेक ठिकाणी लीगचे सामने होण्याची शक्यता वाढली आहे. सुरुवातीच्या अहवालानुसार, मंडळाने महाराष्ट्रात (मुंबई आणि पुणे) लीग आयोजित करण्याची योजना आखली होती. एमसीएने मुंबईतील चार मैदाने वानखेडे, ब्रेबॉर्न, डीवाय पाटील आणि पुणे ही स्टेडियम तयार केली होती. पण एमसीए आणि बीसीसीआय समोर १० संघांना सुविधा पुरवण्याचे मोठे आव्हान आहे.