या ३ खेळाडूंना IPL ने बनवले T-२० स्पेशलिस्ट, आयर्लंड विरुद्ध निवडकर्त्यांनी या खेळाडूंवर केले दुर्लक्ष..!

भारतीय संघाला २६ जून पासून आयर्लंड विरुद्ध दोन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी १७ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. आयपीएल २०२२ दरम्यान दुखापती मुळे संघाबाहेर असलेला टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने आयर्लंड विरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी संघात पुनरागमन केले आहे.

IPL २०२२ मध्ये चांगली कामगिरी करणारे राहुल त्रिपाठी आणि संजू सॅमसन यांची या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे, तर काही खेळाडूची उत्कृष्ट कामगिरी असूनही BCCI आणि निवडकर्त्यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. आम्ही तुम्हाला तीन खेळाडूं बद्दल सांगणार आहोत.

शिखर धवन
टीम इंडियाचा घातक फलंदाज शिखर धवन उर्फ ​​’गब्बर’ याने IPL २०२२ मध्ये अप्रतिम फलंदाजी केली होती. या मोसमात त्याने आपल्या बॅटने खूप धावा केल्या आहेत. पंजाब किंग्जचा सलामीवीर धवनने १४ सामन्यांत ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा केल्या आहेत. IPL २०२२ मध्ये तो चौथा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. या शानदार कामगिरीनंतरही त्याला दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळाली नाही. आता त्याचे नाव आयर्लंड विरुद्धच्या १७ सदस्यीय संघात नाही. त्यामुळे तो टीम इंडियात कधी परतणार? हे पाहणे मनोरंजक असेल.

राहुल तेवतिया
आयपीएल २०२२ मध्ये, गुजरात टायटन्सचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवतियाने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या डावखुऱ्या फलंदाजाने सीझन-१५ मध्ये गुजरात टायटन्ससाठी एकट्याने अनेक सामने जिंकवले आहेत. असे असूनही, या खेळाडूला आयर्लंडविरुद्धच्या T-२० मालिकेत संधी मिळाली नाही.

मोहसीन खान
आयपीएल २०२२ मध्ये, लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसिन खानने त्याच्या किलर बॉलिंगसाठी खूप प्रशंसा मिळवली होती. पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्स या दोन्हीमध्ये चमकदार गोलंदाजी करण्याची कला त्याच्याकडे आहे. आयपीएलच्या मेगा लिलावात टूर्नामेंटचा नवा संघ लखनऊ सुपर जायंट्सने त्याला अवघ्या २० लाख रुपयांना विकत घेतले होते. याआधी मोहसीन खानला मुंबई इंडियन्सने आपल्या संघात स्थान दिले असले तरी तो एकही सामना खेळू शकला नाही. मोहसीन खानने ९ सामन्यात १४ विकेट घेतल्या होत्या. लखनौ सुपर जायंट्सला प्लेऑफमध्ये नेण्यात मोहसीनने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या उत्कृष्ट कामगिरीनंतरही निवडकर्त्यांनी त्याला संधी दिली नाही.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप