IPL ने वाढवली टीम इंडियाची चिंता, T-20 विश्वचषकापूर्वी या ४ मोठ्या अडचणी आल्या समोर..!

आयपीएल १५ चा अर्धा हंगाम संपला आहे. यादरम्यान अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्याच बरोबर अनेक ज्येष्ठ खेळाडू सातत्याने अपयशी ठरत आहेत. आयपीएल २०२२ मध्ये अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. अनेक ज्येष्ठ खेळाडू सातत्याने अपयशी ठरत आहेत. त्या मुळे टी-२० विश्वचषका बाबत निवडकर्त्यां समोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊया या वेळेसही टीम इंडिया च्या T-२० विश्वचषक जिंकण्याच्या मार्गात कोणती चार मोठी आव्हाने आहेत.

यावेळी टीम इंडिया साठी सर्वात मोठी समस्या विराट कोहली आणि रोहित शर्माचा फॉर्म आहे. या मोसमात हे दोन्ही खेळाडू संघर्ष करताना दिसत आहेत. आयपीएल मध्ये विराट ने आता पर्यंत ८ सामन्यांत १७ च्या सरासरीने ११९ धावा केल्या आहेत. याशिवाय रोहित ने इतक्याच सामन्या मध्ये १९ च्या सरासरीने १५३ धावा केल्या आहेत. या मोसमात दोन्ही फलंदाजांच्या बॅटने एकही अर्धशतक झळकावलेले नाही.

View this post on Instagram

A post shared by jasprit bumrah (@jaspritb1)

टी-२० वर्ल्ड कप मध्ये कोहली ला तिसऱ्या क्रमांका वर फलंदाजी करावी लागते. मात्र, आयपीएल मध्ये तो अत्यंत वाईट टप्प्यातून जात आहे. जर आपण त्याच्या ४१ नाबाद आणि ४८ धावा सोडल्या तर त्याने आयपीएल मध्ये १२, ५, १, १२, ० आणि ० धावा केल्या आहेत. यंदा च्या मोसमात तो सलग दोन सामन्यांत खातेही न उघडता बाद झाला आहे.

आयपीएल मध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माचा रेकॉर्ड खूप चांगला राहिला आहे. मात्र, या मोसमात त्याला कर्णधार पदाची कोणतीही छाप सोडता आलेली नाही. या मोसमात त्याने सातत्याने चुकीचे निर्णय घेतले आहेत. अशा परिस्थितीत टी-२० विश्वचषका पूर्वी हा प्रकार टीम इंडिया साठी अडचणीचा ठरू शकतो.

या मोसमात बुमराह ही त्याच्या लय मध्ये दिसत नाही. बुमराहने ८ सामन्यात ३० षटके टाकली आहेत. यादरम्यान त्याने ५ विकेट्स घेतल्या आहेत. यातील ३ विकेटही याच सामन्यात मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत बुमराह ही सातत्या ने संघर्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. टीम इंडियाला १५ वर्षां नंतर टी-२० विश्वचषक जिंकायचा असेल तर बुमराहला पुन्हा एकदा चांगली कामगिरी करावी लागेल.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप