इरफान पठाणने विराट बद्दल केले मोठे वक्त्यव्य, म्हणाला मैदानावर तो..

दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी डिसेंबरमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) विराटला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवले होते. आणि वनडेमध्येही कोहलीच्या जागी हिटमॅनला कर्णधार बनवण्यात आले. मेन इन ब्लूच्या पूर्णवेळ मर्यादित षटकांचा कर्णधार म्हणून रोहित शर्माची नियुक्ती ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेदरम्यान झाला आहे.

दोन्ही संघ तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामने खेळणार आहेत. दरम्यान, सर्वांच्या नजरा विराटवर असतील कारण तो देखील काही काळापासून त्याच्या फॉर्ममुळे चर्चेत आहे आणि या मालिकेत प्रथमच रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे.

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यापुढे भारतीय संघाचे नेतृत्व करणार नाही. कसोटी संघाचे कर्णधार पद सोडल्यानंतर त्याला एकदिवसीय मालिकेच्या कर्णधार पदावरून काढण्यात आले पण, नेतृत्व करत नसला तरी तो नवा कर्णधार रोहित शर्माला मैदानावर योग्य कामगिरी करण्यास नक्कीच मदत करेल, असा विश्वास टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने व्यक्त केला आहे. ICC T-२० विश्वचषक २०२१ च्या समाप्तीनंतर रोहितने कोहलीनंतर T-२० कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

द हिंदूशी संवाद साधताना इरफान पठाण म्हणाला, “कोहली कर्णधार नाही, पण जोपर्यंत तो संघात आहे तोपर्यंत तो एका नेत्याची भूमिका बजावेल. तो नव्या कर्णधाराला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. कोहलीने संघाला योग्य संदेश दिला आणि त्याने संघाचा फिटनेस एका वेगळ्या उंचीवर नेला. मला खात्री आहे की तो पुढे जाऊन इतरांना, विशेषतः रोहित शर्माला मदत करेल. प्रत्येक कर्णधार अनोख्या पद्धतीने योगदान देतो. कोहलीत आक्रमकता होती आणि रोहितमध्ये तुम्हाला शांततादिसेल असेही तो म्हणाला.

“विराट कोहली” हे नाव या क्रिकेट विश्वात कोणत्याही नावास पात्र आहे. क्रिकेटमध्ये त्याने ज्याप्रकारे वेगवान धावा केल्या आहेत, त्याचवेळी त्याला लोकप्रियताही मिळाली आहे. क्रिकेट तज्ज्ञ त्याला भविष्यातील सचिन तेंडुलकर मानतात. कारण तो तेंडुलकरसारख्या बुद्धिमत्तेने फलंदाजी करतो.

भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळणार आहे, मात्र त्याआधीच भारतीय संघ अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. टीम इंडियाचे स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि नवदीप सैनी यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता संघ व्यवस्थापन योग्य संयोजनासह त्यांची प्लेइंग इलेव्हन कशी बनवते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप