इशान किशनने सांगितले की, सर्वोत्तम फलंदाजी साठी मला या खळाडूंनी प्रोत्साहन दिले..!

भारतीय क्रिकेट संघाचा शानदार फलंदाज इशान किशनने श्रीलंके विरुद्ध च्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार खेळी केली होती. त्याने भारतीय संघाला अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियम वर ६२ धावांनी संस्मरणीय विजय मिळवून दिला होता. इशान किशन आणि श्रेयस अय्यर च्या शानदार फलंदाजी नंतर या सामन्यात गोलंदाजांनी ही चमकदार कामगिरी केली होती. इशान किशन ने भारतीय कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पॉवरप्ले मध्ये टीम इंडियासाठी ५८ धावा जोडल्या होत्या. एवढेच नाही तर या दोन्ही फलंदाजांनी टीम इंडिया साठी पहिल्या विकेट साठी १११ धावांची भागीदारी केली होती.

रोहित बाद झाल्यानंतर विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरला तिसऱ्या क्रमांका वर पाठवण्यात आले होते. अय्यर ने इशान किशन सह टीम इंडिया च्या डावाचे नेतृत्व केले आणि टीम इंडियाची धावसंख्या १९९ पर्यंत नेली. ८९ धावांच्या खेळी साठी इशान किशनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ishan Kishan (@ishankishan23)

सामना संपल्या नंतर इशान किशन म्हणाला की, ‘मला वेस्ट इंडिज मालिकेतून खूप काही शिकायला मिळाले. माझ्या मनात फारशी सकारात्मकता ही नव्हती. पुल हा माझा आवडता शॉट आहे, मला तो शॉट खेळायला मजा येते. मी श्रेयस अय्यरशी मिड- विकेट झोन बद्दल बोलत होतो. तो म्हणाला, जर तू चेंडू गॅप मध्ये मारशील तर तुला चौकार मिळू शकतो.

रोहित शर्मा, विराट कोहली आणि राहुल द्रविड यांनी त्याला नेहमीच प्रेरणा कशी दिली हे देखील इशान किशनने उघड केले. इशान किशन म्हणाला, “विराट भाई, रोहित भाई आणि द्रविड सरांनी मला सांगितले की त्यांना माझ्या टॅलेंट बद्दल माहिती आहे. ते माझ्यावर खूप विश्वास ठेवतात. या सर्व गोष्टी एका तरुण फलंदाजाला आनंद व प्रेरणा देतात.

इंडियन प्रीमियर लीगमध्ये, त्याने २०१६ मध्ये गुजरात लायन्सकडून पदार्पण केले आणि त्याच संघाकडून २०१७ पर्यंत खेळला पण २०१८ च्या इंडियन प्रीमियर लीग मध्ये त्याला मुंबई इंडियन्स ने विकत घेतले आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध च्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी करून केवळ १७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. २०२२ च्या इंडियन प्रीमियर लीग लिलावात इशान किशनला मुंबई इंडियन्सने १५.२५ कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप