अक्षय कुमार, रवीना टंडन आणि सुनील शेट्टी हे मोहरा या सुपरहिट चित्रपटा मध्ये काम करणारी अभिनेत्री पूनम झंवर यांना ‘ना कजरे की धार’ या गाण्याने ओळखले जाते. या गाण्यात सुनील शेट्टी सोबत दिसलेल्या पूनमचे लोक वेडे झाले होते. रवीना टंडनची कारकीर्द या चित्रपटापासून सुरु झाली होती पण पूनम झंवर यांना फारसा फायदा झाला नाही. सुमारे १८ वर्षांनंतर पूनम झंवर २०१२ मध्ये ‘ओ माय गॉड’ चित्रपटात दिसली. २७ वर्षांनंतर पूनम आता मोहरामधील भोळी मुलगी राहिली नाही ती आता खूपच धाडसी आणि आकर्षक दिसत आहे.
View this post on Instagram
बॉलिवूडमध्ये यश न मिळाल्यानंतर पूनम साऊथ चित्रपटांकडे वळली. मात्र, पूनम तेथेही काही खास कामगिरी दाखवू शकली नाही. ती काही काळ लाइमलाइटपासून दूर राहिली, नंतर तिने आपली भोळी प्रतिमा बदलली आणि एका लोकप्रिय अवतारात चाहत्यांसमोर आली. आता ती एक प्रसिद्ध मॉडेल बनली आहे.
एका मुलाखतीत पूनमने सांगितले होते की तिचे सौंदर्य वाढविण्यासाठी तिने सर्जरी केलीआहे. सर्जरी नंतर पूनमचा लूक इतका बदलला आहे की तिला ओळखणेही कठीण झाले आहे. ‘ओह माई गॉड’ या चित्रपटामध्ये पूनम अक्षय कुमार आणि परेश रावल या अभिनेत्याबरोबर गोपी मैया भूमिकेत दिसली होती. त्यांची भूमिका राधे माँ यांनी केली होती. पूनम झंवरचे कुटुंब राजस्थानमधील असून नंतर ते मुंबईत शिफ्ट झाले. पूनमचे शालेय शिक्षण व उच्च शिक्षण मुंबईतच पूर्ण झाले आहे. पूनमची आई पूजाश्री हिंदी कवी होत्या त्याची बरीच पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.
चित्रपटात येण्यापूर्वी पूनम झंवर एक यशस्वी मॉडेल होती. तिने किलर जीन्स, डोव्ह सोप अशा बर्याच जाहिरातींमध्ये काम केले आहे. मॉडेलिंग करताना निर्माता गुलशन रॉय यांनी पूनमला पाहिले होते त्यामुळे तिला चित्रपटात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला. पूनमला मोहरामध्ये प्रिया अग्निहोत्रीच्या भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले होते. परंतु त्यातील तिची भूमिका अगदी लहान होती.
View this post on Instagram
यानंतर पूनमने ‘दीवाना हूं मैं तेरा’ आणि ‘जियाला’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले, पण प्रेक्षकांना या चित्रपटांची नावेही आठवली नाहीत. त्यानंतर पूनमने चित्रपट निर्मिती मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि ‘आंच’ हा चित्रपट बनविला ज्यामध्ये नाना पाटेकर, परेश रावल आणि स्वत: पूनम यांनी काम केले होते. या सिनेमात पूनमने एक गाणेही गायले होते.
पूनम झंवरने २०१४ मध्ये बोल्ड फोटोशूट केले होते. या फोटोशूट मध्ये ‘ना काजरे कि धार’ च्या गाण्यामध्ये ढगांच्या मागुण हसताना दिसणार्या मोहरा चित्रपटाची पूनमची प्रतिमा सापडली नाही. या फोटोशूटमध्ये पूनमचा बदललेला लुक पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले. पूनम झंवर २०१३ मध्ये ‘आर राजकुमार’ या चित्रपटात शेवटची दिसली होती. या चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि सोनाक्षी सिन्हा तिच्यासोबत होते.
View this post on Instagram
याशिवाय पूनमने ‘२ जी रेडिएशन’ या दुसर्या चित्रपटातही काम केले आहे. २ जी घोटाळ्यावर आधारित या चित्रपटात पूनम नीरा राडियाची भूमिका साकारली होती. पूनमच्या म्हणण्यानुसार, तिच्या कारकीर्दीची ही सर्वात अवघड भूमिका होती. पूनम झंवर २०१२ मध्ये अण्णा हजारे यांच्या चळवळीतही दिसली होती. आता पूनम काही स्वयंसेवी संस्थांबरोबर काम करत आहे. पूनम झंवरचे इंस्टाग्राम हॉट चित्रांनी भरलेले आहे.