कोणत्याही क्रिकेटपटूला टीम इंडिया मध्ये खेळणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असते, त्याचप्रमाणे कोणत्याही खेळाडूला टीम इंडिया मध्ये राहणेही तितकेच अवघड असते. आज भारतीय क्रिकेट संघात उत्तम कामगिरी करणाऱ्या जबरदस्त खेळाडूंचा भरणा आहे आणि त्याच खेळाडूं मुळे अनेकवेळा अशी परिस्थितीही निर्माण होते की ते टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन मधून बाहेर पडले तर ते संघात परततील हे अशक्य होऊन बसते. आम्ही अशा २ खेळाडूं बद्दल सांगणार आहोत जे प्रतिभावान खेळाडू असूनही, आजच्या युगात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग नाहीत आणि त्यांच्या टीम इंडिया मध्ये पुनरागमन होण्याची शक्यताही कमी असल्याचे दिसते.
केदार जाधव
केदार जाधव ने १६ नोव्हेंबर रोजी श्रीलंके विरुद्ध भारतीय संघात पदार्पण केले होते. त्याने ८ फेब्रुवारी २०२० रोजी न्यूझीलंड विरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. तेव्हा पासून केदार टीम इंडियात परतण्याचा प्रयत्न करत आहे. या वर्षी भारताने प्रत्येक फॉरमॅटच्या अनेक मालिका खेळल्या पण केदार जाधवच्या नावाचा समावेश नव्हता.
View this post on Instagram
केदार जाधवला टी-२० सामन्यां पेक्षा एकदिवसीय सामन्यां मध्ये जास्त संधी मिळाल्या होत्या. जाधवने टीम इंडिया साठी एकूण ९ टी-२० आणि ७३ एकदिवसीय सामने खेळले आहेत, जाधवने ९ टी-२० आणि ७३ वनडे सामने खेळले आहेत. जाधवने ९ टी-२० सामन्यां मध्ये १२२ धावा केल्या आहेत, व ७३ वनडेमध्ये १३८९ धावा केल्या आहेत. केदार जाधवला एकही कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. संघ निवड समिती आता जाधवचा क्वचितच विचार करेल आणि आता त्याला संघात खेळण्याची संधी देऊ शकेल असे दिसते आहे. त्याने दीर्घकाळ टीम इंडियात निवड न झाल्याने जाधवचे टीम इंडियात जाण्याचे दरवाजे बंद झाले आहेत.
शिवम दुबे
अष्टपैलू खेळाडूचा दर्जा असलेल्या शिवम दुबेची कहाणी दयनीय आहे. शिवम दुबेला ही टीम इंडिया कडून मिळालेल्या संधींचे सोने करता आले नाही. दुबेला टीम इंडिया साठी १ वनडे आणि १२ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली होती. दुबेने पहिला आणि शेवटचा एकदिवसीय सामना १५ डिसेंबर २०१९ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला २०२० मध्ये न्यूझीलंड विरुद्ध च्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली होती. पण फॉर्म मध्ये नसलेला शिवम दुबे आपली जादू दाखवू शकला नाही. तेव्हा पासून शिवम दुबेला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. आता दुबेची टीम इंडियात परतण्याची शक्यता दिसत नाही.