इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका जिंकल्यानंतर टीम इंडियाची आघाडी आता वनडे मालिकेकडे वळली आहे. पहिला एकदिवसीय सामना १२ जुलै रोजी दुपारी १ वाजता होणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील हा सामना किया ओव्हल येथे होणार आहे. नुकत्याच झालेल्या टी-२० सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने इंग्लंडला गुडघे टेकण्यास भाग पाडले होते. भारताने पहिले दोन सामने जिंकले होते तर भारत शेवटचा सामना केवळ १७ धावांनी हरला होता.
पुढील वनडे प्लेइंग इलेव्हन वर एक नजर टाकूया. सलामीची जोडी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ सारखी दिसेल. शिखर धवनचे प्रदीर्घ कालावधी नंतर भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. रोहित शर्मा सोबत ओपनिंग करताना दिसणार आहे. सलामीची जोडी शिखर धवन आणि रोहित शर्मा असणार आहे.
विराट कोहली तीन नंबरवर फलंदाजी करताना दिसणार आहे. नुकत्याच झालेल्या सामन्या नंतर च्या सादरीकरणात रोहित शर्माने सांगितले की, आम्ही विराटला सपोर्ट करू. संपूर्ण दशकात त्याच्या सारख्या धावा कोणी केल्या नाहीत. काही खराब सामन्यामुळे आम्ही त्याला संघातून काढून टाकणार नाही. अशा परिस्थितीत विराट कोहली वनडे संघात तिसऱ्या क्रमांका वर खेळू शकतो.
View this post on Instagram
आता नंबर ४ ची पाळी आली आहे. आम्हाला मागच्या वेळी देखील सांगण्यात आले होते की सूर्यकुमार यादवने ४ व्या क्रमांकावर आपली जागा निश्चित केली आहे. श्रेयस अय्यरसाठी कर्णधाराची पहिली निवड सूर्या आहे. ज्याला त्याच्या दमदार फॉर्म आणि कामगिरी मुळे संधी मिळू शकते.
आता यष्टिरक्षक फलंदाजाची पाळी आहे. ऋषभ पंतला कोणी कसे विसरू शकेल. एजबॅस्टन येथे शतक ठोकल्या नंतर त्याने टी-२० क्रिकेट मध्ये सलामी दिली होती. त्यामुळे पाचव्या क्रमांक वर ऋषभ पंत दिसू शकतो. त्यांच्या सोबत हार्दिक पंड्या आतिषबाजी करणार आहे. भारताचा नंबर १ अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघाला संतुलन प्रदान करेल. वेगवान गोलंदाजी सोबतच लांब षटकार मारण्याचीही ताकद त्याच्यात आहे. असा कुन्फू पंड्या संघात नक्कीच असेल.
दुसऱ्या टी-२० सामन्याचा हिरो त्याच्या सोबत असेल. ज्याने ऋषभ पंतसह एजबॅस्टन येथे इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले होते. असा आहे शतकवीर अष्टपैलू रवींद्र जडेजा. जडेजा हा डावखुरा खेळाडू असल्याने त्याला संघात स्थान मिळू शकते. वेगवान गोलंदाजांमध्ये जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी असतील. भारताकडे १० व्या स्थानासाठी वेगवान गोलंदाजाचा पर्याय आहे. ज्यासाठी प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि नवोदित अर्शदीप सिंग असतील. या जागेसाठी लढाई सुरू आहे. युझवेंद्र चहल शेवटचे स्थान घेऊ शकतो यात शंका नाही.