मुंबई: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी याची ओळख आहे.जरी ते आता जगातील श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले असले तरी त्याचे भारतात वर्चस्व कायम आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेयरमैन अरबपति मुकेश अंबानी यांना सोमवारी ३.६ अरब डॉलर चा झटका बसला आणि त्यांची संपत्ती आता ७५.८ अरब डॉलवर आली आहे.
ते जागतिक टॉप-10 ( World Top 10 Richest Person) क्रमवातुन दहा क्रमांकाच्या व्यक्तींच्या यादीतुन बाहेर गेले., परंतु त्यांची आता संपत्ती स्थिर होती. कोरोना कालावधीत त्याची खूप प्रमाणात संपत्तीत वाढ झाली आहे. ताज्या रिपोर्टनुसार कोरोना काळात श्रीमंत खूपच श्रीमंत झाले आणि गरीब खूपच गरीब होत गेले .
कोरोना मध्ये वाढली संपत्ती :ऑक्सफैम( Oxfam) च्या रिपोर्टनुसार कोरोनाच्या काळात देशातील गरीब आणि श्रीमंत यांच्यातील अंतर खूप वाढवलेले आहे. जेथे श्रीमंतांची संपत्ती वेगाने वाढताना दिसली , तिथेच गरीबांना आपले घर चालवण्यासाठी हि खूप समस्येचा सामना करावा लागला.ऑक्सफैम आपल्या ताज्या अहवालात ही माहिती दिली आहे कि , ज्यात श्रीमंतांची संपत्ती कशी वाढली आणि गरीब अधिकच गरीब कशे होत गेले.
प्रत्येक तासाला ९० कोटी कमवतो अंबानी : ऑक्सफैम( Oxfam) एक वैश्विक संगठन आहे. जो जगभरातील दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्य करत असते. ऑक्सफॅमने आपल्या अहवालात असे म्हटले आहे की कोरोना च्या काळात भारतीय अब्जाधीशांची संपत्ती ३५% वाढली आहे, तिथेच लॉकडाऊन मुले गरिबांना खाण्या पिण्यासाठी हि संघर्ष करावा लागत आहे. संस्थेने आपल्या रिपोर्ट मध्ये ‘इनइक्वालिटी वायरस’ असा या वायरस चा उल्लेख केला आहे. ज्यात असे म्हटले आहे की मार्च २०२० नंतर भारतातील १०० अरबपतिची संपत्ती १२,९७,८२२ कोटींनी वाढली आहे.
अम्बाणीला एका तासामध्ये जेवढे उत्पन्न कमवतो तेवढे कामगाराळ कामवाय 10000 वर्षे लागतील: कोरोना संकटाच्या काळात अंबानी दर तासाला 90 कोटी रुपये कमवत आहेत. तेवढेच अशिक्षित कामगारांना हे पैसे कमवण्यासाठी तब्बल 10,000 वर्षे लागतील, त्याच वेळी, अंबानीने प्रत्येक सेकंदाला जितके पैसे मिळवतो तितक्या कमाईसाठी एका कामगाराला 3 वर्षे लागतील. ऑक्सफॅमने आपल्या अहवालात उत्पन्नाच्या
असमानतेचा उल्लेख केला आहे.ऑक्सफॅमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ बिहार यांनी देशात उत्पन्नाची असमानता कशी आहे याचा उल्लेख केला आहे, ज्यामुळे श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत आणि कोट्यावधी लोक अतिशय गरिबी मध्ये जीवन जगत आहेत. ते म्हणाले की लॉकडाऊनच्या वेळी ही असमानता सर्वान समोर आली आहे .ऑक्सफॅमच्या या सर्वेक्षण अहवालासाठी तब्बल ७९ देशातील २९५ अर्थशास्त्रज्ञांनी आपले मत मांडले आहे.