ऐकावे ते नवलंच!! फाडफाड इंग्रजी बोलणारी कतरिना कैफ कधीच शाळेत गेली नाही….!!वाचून धक्काच बसेल

वरील बातमी वाचून आश्चर्य वाटलं ना? हो पण हे खरं आहे! आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी, नमस्ते लंडन, टायगर झिंदा हें, वेलकम या सारखे ब्लॉकबस्टर हिट सिनेमे देणारी सुंदर अभिनेत्री कतरिना कैफ आत्तापर्यंत कधीच शाळेत शिकायला गेलेली नाही!

पूर्वाश्रमीची कतरिना कैफ आणि सध्याची कतरिना विकी कौशल असलेल्या कतरिनाचे मूळ शिक्षण कितवी पर्यंत झाले? या प्रश्नाचे उत्तर
तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचत राहा!

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरीनाचा नवरा विकी कौशल हा शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर पदवीधर आहे पण याच विकी कौशलची बायको जी प्रत्येक इंटरव्यू मध्ये फाडफाड इंग्रजी बोलताना दिसते प्रत्यक्षात ती कधीच शाळेत गेलेली नाहीये !! अहो असं कसं शक्य आहे? पण हा असं खरंच झालय आणि यामागचे मुख्य कारण म्हणजे सततचा प्रवास!

काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी असणारे कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ, तर आई सुझान वंशाने ब्रिटिश आहे. कतरिना लहान असतानाच तिच्या आई-वडिलांचा डा यव्होर्स झाल्याने तिच्या आईनंच कतरिनाला लहानाचं मोठं केलं. कतरिनाच्या आईने स्वतःला समाज कार्यात वाहून घेतल्याने त्याच्या कामासाठी तिला अनेक देशांमध्ये भ्रमंती करावी लागत असे.

View this post on Instagram

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

कतरिनाचा जन्म हाँग काँगमध्ये झाला. परंतु नंतर चीन, जपान मग जपानमधून बोटीने फ्रान्स, स्वित्झर्लंड अशा जवळपास १८ देशांमध्ये कतरिनाचं बालपण गेलं. सतत देश बदलतं असल्याने कतरिना शाळेत कधीच जाऊ शकली नाही. तिने आणि तिच्या बहिणींनी घरीच शिक्षण घेतलं. तिला शिकवण्यासाठी होम ट्यूटर नियुक्त करण्यात आलेले. पोलंड, बेल्जियम, हवाई आणि मग कतरिनाचं कुटुंब शेवटी लंडनमध्ये स्थायिक झालं.

वयाच्या चौदाव्या वर्षी मॉडेल म्हणून काम करणारी कतरिना मुंबईत आली तेव्हा तिच मॉडेलिंग सुरूच राहिलं आणि नंतर चित्रपटातुन झळकल्यानंतर आपल्या अभिनयाच्या जोरावर तिची गणना भारतातल्या टॉपच्या अभिनेत्रींमध्ये करण्यात येऊ लागली. सध्याच तिच्या आणि विकी कौशल सोबत झालेल्या लग्न बंधनाच्या चर्चेमुळे देखील दोघेही काही काळ चर्चेत होते.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप