भारताचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीची बॅट गेल्या काही काळापासून शांत आहे. त्याच्या खराब फॉर्मवर सतत काहीना काही विधाने केली जात आहेत. विराटसाठी गेली ३ वर्षे खूप कठीण गेली. त्याचे शेवटचे शतक 22 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरुद्ध झाले होते. त्यानंतर शतकाचा दुष्काळ त्याला अजून संपवता आलेला नाही. अखेर त्याच्या फलंदाजीत असे काय घडले आहे ज्यामुळे मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरत आहेत. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातही विराटला मोठी खेळी खेळता आली नाही आणि 16 धावा केल्यानंतर त्याची विकेट गमवावी लागली. यानंतर त्याच्यावर जोरदार टीका होऊ लागली आणि संघाबाहेरच्या गोष्टीही घडू लागल्या. मात्र, सततच्या टीकेदरम्यान भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने दिला त्याला लाख मोलाचा सल्ला.
View this post on Instagram
विराट त्याच्या फॉर्मपासून फक्त एक फोन दूर आहे: अजय जडेजाने सोनी नेटवर्कशी संवाद साधताना सांगितले की, विराट त्याच्या फॉर्मपासून फक्त एक फोन दूर आहे. लॉर्ड्सच्या वनडेनंतर जडेजा म्हणाला की, विराट कोहलीने सचिनशी बोलायला हवे. त्याला फक्त सचिन तेंडुलकरच मदत करू शकतो. यावेळी विराटने सचिनला फोन करून त्याच्याशी लंच किंवा डिनरवर बोलावले पाहिजे, असे तो म्हणाला. याशिवाय मला विराटला मदत करणारा दुसरा कोणी दिसत नाही. तो सचिनपासून हाकेच्या अंतरावर आहे. मला आशा आहे की जर विराटने त्याला फोन केला नाही तर सचिनने त्याला कॉल करावा. तू मोठा आहेस, तू ही अवस्थाही पाहिली आहेस, त्यामुळे अशा स्थितीत धाकट्याला बोलावणे तुझे कर्तव्य ठरते. सचिनही असेच करेल अशी मला आशा आहे.
सचिनच्या आधीही मदत मिळाली आहे: 2014 मध्ये विराट कोहलीने सचिनकडे मदत मागितली होती. इंग्लंड दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत विराट कोहलीची सरासरी फक्त 13.50 आहे. विराट कोहलीने ऑफ स्टंपबाहेरील चेंडूंवर सातत्याने विकेट गमावली. त्यानंतर तो मुंबईला परतला आणि त्याने सचिन तेंडुलकरकडे मदत मागितली. सचिनने विराट कोहलीला मदत केली आणि त्याच्या फलंदाजीची भूमिका बदलली आणि ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर विराट कोहलीने कसोटी मालिकेत 692 धावा केल्या. आता विराट कोहली त्याच्यापेक्षा वाईट कंडिशन मधून जात आहे आणि कदाचित त्याला मदत करण्यासाठी सचिनपेक्षा चांगला कोणी पर्याय नसेल.
विराटच्या ७१व्या शतकाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे: विराट कोहलीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके झळकावली आहेत. विराटच्या ७१व्या शतकाची प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्थितीत त्याच्याकडून त्याच्या शतकाचा दुष्काळ लवकरात लवकर संपवावा आणि मोठी खेळी पाहायला मिळावी, अशी अपेक्षा जगभरातील चाहत्यांना आहे.