जे मराठी सिनेश्रुष्टि, बॉलीवुड ला जमले नहीं ते साउथ चित्रपटश्रुष्टि ने करुण दाखवले, साऊथ सुपरस्टार्सनी दिली छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना!

भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपट ‘बाहुबली’ ज्यांनी दिग्दर्शीत केलाय ते एस. एस. राजामौली यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट RRR येत्या २५ मार्च रोजी सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. राजामौली यांनी या सिनेमा वेळी केवळ चित्रपटाच्या तांत्रिक बाबींवरच नाही तर दक्षिणेतील सुपरस्टार राम चरण आणि ज्युनियर एनटीआर या दोन सुपरस्टार्सच्या मदतीने भारताचा प्रेरणादायी इतिहास दाखवण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. रामचरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच अभिनेत्री आलिया भट्ट ही देखील या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आहे.

या चित्रपटात रामचरणने स्वातंत्र्यसैनिक ‘अल्लुरी सीताराम राजू’ यांची भूमिका साकारली आहे. तर, ज्युनियर एनटीआर ‘कोमाराम भीम’ यांच्या भूमिकेत झळकताना दिसणार आहे. नुकतंच या सिनेममधील ‘शोले’ हे गाणं प्रदर्शित झालं असून या गाण्यात हे तिन्ही कलाकार देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांना मानवंदना देताना दिसत आहे. ‘वीर मराठा शोले’ असं म्हणत रामचरण आणि ज्युनियर एनटीआरने छत्रपती शिवाजी महाराजांचाही जयजयकार या गाण्यामध्ये केला आहे.

या गाण्याला ‘आरआरआर सेलिब्रेशन अँथम’ असं नाव दिलं आहे. राजामौली, ज्युनियर एनटीआर आणि रामचरण ही तिघेही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दिगग्ज कलाकार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. त्यापूर्वी या सिनेमातील प्रदर्शित करण्यात आलेल्या या गाण्याला २४ तासांच्या आत युट्यूबवर ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचे चित्र समोर आले आहे. या गाण्यात जेव्हा ज्युनियर एनटीआर आणि रामचरण हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतात, तेव्हा अंगावर काटा आल्याची भावना नेटकऱ्यांनी व्हिडीओच्या कमेंट्समध्ये व्यक्त केली आहे. ‘यालाच मास्टरपीस म्हणतात’, अशीही कॉमेंट एकाने केली आहे.

राजामौली यांनी दिग्दर्शीत केलेला हा बहुचर्चित चित्रपट भारतीय इतिहासातील ‘अल्लुरी सीताराम राजू’ आणि ‘कोमाराम भीम’ या दोन वास्तविक जीवनातील नायकांच्या जीवनावर आधारित बनलेला आहे. गेल्या तीन वर्षांपासून या चित्रपटाची शूटिंग सुरू आहे. केवळ दक्षिणेतच नाही तर जगभरात आतापासूनच या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एमएम किरवाणी यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. हा चित्रपट १२ जानेवारी रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. मात्र अचानक वाढलेल्या कोविड केसेसमुळे चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. आणि आता अखेरीस येत्या २५ मार्च रोजी हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप