‘झुंड’ चित्रपटासाठी बिग बींनी घेतलेलं मानधन चक्क एवढे कमी मानधन, मला पैसे देण्यापेक्षा..!

सध्या सोशल मीडियावर झुंड या चित्रपटाची तुफान चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी प्रशिक्षकाची प्रमुख भूमिका साकार केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलं आहे. हा चित्रपट स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित असल्याचे समजते. अमिताभ बच्चन यांनी या चित्रपटात फुटबॉल कोच आव्हानात्मक भूमिका साकार केली आहे. या चित्रपटाचे निर्माते संदीप सिंह यांनी या चित्रपटासाठी अमिताभ यांनी घेतलेल्या मानधनाबाबत सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

संदीप सिंह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘बच्चन सरांना या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली. कमी बजेटमध्ये या चित्रपटाची निर्मीती कशी करायची असा आम्ही विचार करत होतो. तेव्हा अमिताभ बच्चन यांनी त्यांचे मानधन कमी केले. ते म्हणाले होते की, माझ्यावर पैसे खर्च करण्यापेक्षा चित्रपटावर पैसे खर्च करूयात.तसेच अमिताभ बच्चन यांच्या स्टाफनं देखील त्यांचे मानधन कमी केले.’

संदीप सिंह यांनी पुढे सांगितलं, ‘२०१८ मध्ये नागराजनं पुण्यात या चित्रपटाचा सेट उभारला होता. पण पैसे कमी असल्यानं हा सेट हटवण्यात आला. टी सीरिजच्या सहाय्यानं आम्ही चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात केली, आम्ही पूर्ण चित्रपटाचे शूटिंग हे नागपूर येथे केले. मी यासाठी भूषण कुमार यांचे विशेष आभार मानतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

झुंड चित्रपटाचे कथानक हे स्लम सॉकरटचे संस्थापक विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. झुंड चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच आकाश ठोसर, रिंकू राजगुरु आणि सायली पाटील या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकार केल्या आहेत. हा चित्रपट पाहिल्यानंतर धनुष, सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव आणि आमिर खान या अभिनेत्यांनी देखील सोशल मीडियावर चित्रपटाचे खूप कौतुक केले होते. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे.

झुंड चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक सगळीकडे होत असून संपूर्ण टीम वर असा सुंदर सिनेमा बनवल्या बद्दल अभिनंदनाच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे! हा सिनेमा ४ मार्च २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला असून इतक्या आठवड्या नंतरही याचाच बोलबाला सगळीकडे आहे! याचे रिव्ह्यू सगळीकडे वेगात वेगवेगळे हॅशटॅग घेऊन प्रसिद्ध  होताना दिसत आहेत. चित्रपट समीक्षकां कडून हि या सिनेमाला विशेष दाद मिळाली आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप