जीव माझा गुंतला या मालिकेतील ‘हा’ अभिनेता अडकला लग्नाच्या बेडीत! पहा लग्नातील फोटो..

जीव माझा गुंतला या कलर्स मराठी वाहिनीवरील मालिकेला प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मालिकेतून दाखवण्यात आलेली अंतरा आणि मल्हारची जोडी प्रेक्षकांना खुपच आवडली आहे. या मालिकेत मेघची भूमिका साकारणारा कलाकार नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. अभिनेता रौनक शिंदे याने या मालिकेत मेघची भूमिका साकार केली आहे. काही दिवसांपूर्वी उ अंटा वा या पुष्पा चित्रपटातील गाण्यावर नवरा नवरीने तुफान डान्स केलेला, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हे नव विवाहित दाम्पत्य म्हणजेच अभिनेता रौनक शिंदे आणि त्याची पत्नी प्राची मोरे हे दोघे आहेत. त्यांच्या लग्नाची खास आठवण म्हणून हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करण्यात आला होता.

हा व्हिडीओ खूप प्रेक्षकांना आवडला असल्याच्या प्रतिक्रिया त्यांना कॉमेंट्स मधुन ​​मिळाल्या होत्या. २ फेब्रुवारी २०२२ रोजी रौनक शिंदे आणि प्राची मोरे यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. वैयक्तिक आयुष्यात रौनक शिंदे हा एक अभिनेता तसेच दिग्दर्शक देखील आहे. जीव माझा गुंतला या मालिका व्यतिरिक्त रौनक स्वराज्यजननी जिजामाता, फ्रेशर्स या मालिकांमधुन आतापर्यंत झळकला आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या रौनकने एकांकिका स्पर्धांमधून अभिनयाची चुणूक दाखवायला सुरुवात केलेली. इथूनच त्याला प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटकातून सहभागी होण्याच्या संधी मिळाल्या. भास आभास, स्वर्गीय छोटाला, ऑल द बेस्ट २, दिनूच्या सासूबाई राधाबाई, प्लॅंचेट या नाटकांमधून त्याने आपल्या दमदार अभिनयाने महत्वपूर्ण भूमिका साकार केल्या आहेत.

रौनकची पत्नी प्राची मोरे ही व्यावसायिक फोटोग्राफर आहे. पाईन अँप्पल नावाच्या फोटो स्टुडिओ मध्ये ती फोटोग्राफीचा व्यवसाय चालवत आहे. याशिवाय बॉम्बे मिल्स आणि मोम्मोलेट्स अशा कपड्यांच्या आणि विविध प्रकारच्या चॉकलेटच्या व्यवसायात देखील ती सक्रिय असलेली दिसते. रौनक आणि प्राची यांचा विवाह सोहळ्यातील त्यांचा नृत्याचा भन्नाट व्हिडिओ पाहून प्रेक्षकांनी त्यांना मनसोक्त छान छान प्रतिक्रिया देऊन व्हिडिओ आवडल्याचे सांगितले होते. मात्र हे दोघेही मराठी सिनेसृष्टीशी जोडले असावेत याचा अंदाजही त्यावेळी कोणालाच आला नव्हता. प्राची आणि रौनक या नवविवाहित दाम्पत्यास आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप