इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटचा उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात जो रूटने अवघ्या ११५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळवला जात आहे. याआधी जो रूटने लॉर्ड्स कसोटीत नाबाद ११५ धावांची खेळी केली होती. अशाप्रकारे रुटचे हे सलग दुसरे शतक आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये 27 शतके झळकावली आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत २७ शतके झळकावली आहेत. अशा प्रकारे जो रूटने स्टीव्ह स्मिथची बरोबरी केली आहे. त्याचबरोबर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या नावावर २७ कसोटी शतके आहेत. उल्लेखनीय म्हणजे, विराट कोहलीने नोव्हेंबर २०१९ मध्ये शेवटचे शतक झळकावले होते. तर स्टीव्ह स्मिथने शेवटचे शतक जानेवारी २०२१ मध्ये कसोटी सामन्यात केले होते. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने गेल्या १८ महिन्यांत १० शतके झळकावली आहेत. तर रुटचे गेल्या ५ कसोटी सामन्यांमधील हे चौथे शतक आहे.
याआधी जो रूटने लॉर्ड्स कसोटीत आपल्या कसोटी कारकिर्दीत १० हजार धावांचा टप्पा ओलांडला होता. रुट १०,०००धावा करणारा दुसरा इंग्लिश फलंदाज ठरला . वास्तविक, जो रूटच्या या शतकानंतर अनेक दिग्गजांचा असा विश्वास आहे की, जो रूट आगामी काळात महान भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडू शकतो. सचिन तेंडुलकरच्या नावावर २०० कसोटी सामन्यांमध्ये १५९२१ धावा आहेत. इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट अवघ्या ३१ वर्षांचा आहे. अशा परिस्थितीत हा इंग्लिश फलंदाज सचिन तेंडुलकरचा कसोटी धावांचा विक्रम मोडू शकतो, असे मानले जात आहे. आता येत्या काळात जो रूटचा फॉर्म कसा होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने आतापर्यंत कसोटी सामन्यांमध्ये २७ शतके झळकावली आहेत. जो रूटने न्यूझीलंडविरुद्धच्या ट्रेंट ब्रिज कसोटीत ११५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत ३१ वर्षीय जो रूटचे एकूण ८९७ गुण आहेत. त्याला पदाचा फायदा झाला. त्याचवेळी मार्नस लॅबुशेन पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याला ८९२ गुण आहेत. टॉप-१० बद्दल बोलायचे झाले तर इतर कोणातही बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ८४५ गुणांसह तिसऱ्या, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम ८१५ गुणांसह चौथ्या आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ७९८ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. कोरोनामुळे तो मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दिसला नाही. रूटने हे सर्व मागे सोडले आहे.