जोस बटलरने ऑल टाइम IPL ११ निवड केली, या मुंबई इंडियन्सच्या ४ खेळाडूंना दिली जागा..!

राजस्थानचा सलामी वीर जोस बटलर ने त्याची सर्वकालीन IPL XI निवडली आहे. बटलर ने या संघात एमएस धोनी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या मोठ्या नावांना स्थान दिले आहे, परंतु त्याने अनेक मजबूत खेळाडूं कडे दुर्लक्ष केले आहे. बटलरच्या आयपीएल इलेव्हन मध्ये सात भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आहे तर वेस्ट इंडिज, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचा प्रत्येकी एक खेळाडू आहे.

राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज जोस बटलर ने काही काळा पूर्वी आपला आवडता ऑल टाइम आयपीएल इलेव्हन संघ निवडला आहे. जोस बटलर सध्या आयपीएल सीजन १५ मध्ये ऑरेंज कॅप रेस मध्ये सर्वात पुढे असून आता पर्यंत त्याने ११ सामन्यात ६१८ धावा केल्या आहेत. या इंग्लिश फलंदाजा ने राजस्थान रॉयल्स च्या दोन खेळाडूंचा आपल्या संघात समावेश केला आहे. जोस बटलरने स्वत: रोहित शर्मासह आपल्या संघात सलामीची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच बरोबर आरसीबी चे स्टार फलंदाज विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांना मधल्या फळीत स्थान देण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Jos Buttler (@josbuttler)

इंग्लिश यष्टिरक्षक फलंदाजा ने आपल्या आवडत्या आयपीएल इलेव्हन मध्ये विकेट किपिंग ची जबाबदारी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर सोपवली आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याने एमआय स्टार कायरन पोलार्ड आणि सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजा यांचा समावेश केला आहे. याशिवाय जोस बटलरने हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह आणि श्रीलंकेचा यॉर्कर किंग लसिथ मलिंगा यांना आपल्या संघात गोलंदाजी साठी सामील केले आहे.

बटलर ने अशा अनेक मोठ्या नावा कडे दुर्लक्ष केले आहे. त्याने अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांका च्या यशस्वी फलंदाजा मध्ये शिखर धवन व सुरेश रैना याना जागा दिली नाही. त्याने डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, हार्दिक पांड्या आणि आंद्रे रसेल या खेळाडूंना बाहेर ठेवले आहे, जे त्यांच्या वेगवान फलंदाजी साठी ओळखले जातात. याशिवाय बटलर ने आयपीएल मधला दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज अमित मिश्रा यालाही संघात स्थान दिले नाही.

जोस बटलरचा ऑलटाईम आयपीएल इलेव्हन संघ पुढीलप्रमाणे आहे: जोस बटलर, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, एमएस धोनी (डब्ल्यूके), किरॉन पोलार्ड, रवींद्र जडेजा, हरभजन सिंग, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप