नुसता पैसाच पैसा..! KGF चॅप्टर 2 ने बॉक्स ऑफिस वर केले तगडे कलेक्शन, एका दिवसाच्या कमाईत आपल्या १० पिढ्या जगतील..!

एखाद्या चित्रपटाचा जेव्हा पहिला भाग येतो त्यानंतर त्याचा दुसरा भाग काढण्याची नवीन क्रेझ बॉलीवूड आणि टॉलीवूड दोन्ही इंडस्ट्री मध्ये सुरू झालेली आहे. कन्नड सुपरस्टार यशचा बहुचर्चित चित्रपट केजीएफ चॅप्टर २ नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची पहिल्या भागापासून चर्चा रंगली होती. आता याच्या भाग दोनने प्रदर्शनाच्या दिवशी मोठा धमाका केला आहे. केजीएफ टू या प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अनेक चित्रपटांचे विक्रम मोडीत काढले आहे.

केजीएफ २ च्या हिंदी व्हर्जनने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली आहे आणि मोठ्या नामांकित चित्रपटांना यात मागे टाकल आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जननेही पहिल्याच दिवशी चक्क ५३.९५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे, तर भारतात १३४.५ कोटी रूपयांची कमाई केली आहे!
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने चित्रपटाच्या कमाईची माहिती सर्वांना दिली आहे.
ठग्स ऑफ हिंदुस्तान यासारख्या सुपरहिट चित्रपटांना केजीएफ 2 ने मागे टाकण्यात यश मिळवले आहे! के जी एफ चॅप्टर वन हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर त्याच्या दुसर्‍या भागाची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत होते.

केजीएफ 2 ने मोडले सगळे विक्रम!

केजीएफ 2~ 53.95 कोटी रुपये
वॉर~50.75 कोटी रुपये
ठग्स ऑफ हिंदुस्थान ~50.75 कोटी रुपये

स्वतःच्या चित्रपटाचा विक्रम मोडीत काढला यशने!!

सुपरस्टार यश चा केजीएफ भाग १ या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनचा लाईफ टाईम बिझनेस ४४.०९ कोटी रुपये इतका झाला होता. आता हा आकडा केजीएफ च्या भाग 2 ने पहिल्याच दिवशी पार करून टाकला आहे! बॉक्स ऑफिसवर आगामी काही दिवसात हा सिनेमा इतरही चित्रपटांचे विक्रम मोडीत काढणार यात काही शंकाच उरली नाहीये!!

या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले होते. म्हणजेच ऍडव्हान्स बुकिंग बाबतीतही या सिनेमाने एस एस राजमौली यांच्या RRR या सिनेमाचा ही विक्रम मोडला! केजीएफ 2 चित्रपटाच्या प्रदर्शनाला फक्त चार दिवस राहिले असताना, केजीएफ टू च्या हिंदी व्हर्जन ची जवळपास अकरा कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. आता ही तुलना पाहता RRR च्या हिंदी व्हर्जनचे फक्त पाच कोटी रुपयांचे ॲडव्हान्स बुकिंग झालेलं होतं. चित्रपट व्यापार विश्लेषकां कडून मिळालेल्या माहितीनुसार या कन्नड चित्रपटाने उत्तर भारतात ॲडव्हान्स बुकिंग मधून आत्तापर्यंत जवळपास वीस कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप