मित्रांनो हल्ली जिकडे पाहावं तिकडे आपल्याला “पुष्पा” या चित्रपटाने, त्यातील गाण्यांनी, त्यातल्या कडक डायलॉग्सनी धुमाकूळ घातलेला दिसत आहे. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांनी मुख्य पात्रे साकारली आहेत. तर सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर, ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रचंड धूमाकळ घालत असून या चित्रपटातील प्रत्येक कलाकार हे अल्पावधीतच चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. तर मित्रांनो या चित्रपटात केशवची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याविषयी आम्ही आज या लेखातून तुम्हांला सांगणार आहोत.
पुष्पा चित्रपटातील अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या जोडीसोबत आणखी एक भूमिका भरपूर गाजली, ती म्हणजे केशवची. ही भूमिका अभिनेता जगदीश प्रताप भंडारी याने साकारली असून ही भूमिका तो अक्षरशः जगला आहे! चित्रपटांमध्ये पुष्पाला प्रत्येक टप्प्यावर खंबीर साथ देणाऱ्या केशवने आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्यामुळे सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. केशवच्या भूमिकेसाठी त्याने जीव ओतून मेहनत घेतली आहे. त्यामुळे हा कलाकार नेमका आहे तरी कोण ? तो सध्या काय करत आहेत, असे खूप सारे प्रश्न आपल्या नेटकर्यांना पडले आहेत आणि त्याचीच उत्तरे जाणून घेण्यासाठी त्याचे फॅन्स देखील खूप उत्सुक दिसत आहेत.
आपला केशव म्हणजेच अभिनेता जगदीश प्रताप भंडारी याचा जन्म तेलंगणा मध्ये १८ जानेवारी १९९३ रोजी झाला असल्याचे समजते. तेलुगु सिनेविश्वातील हा एक खूप नावाजलेला प्रसिद्ध अभिनेता आहे. जगदीश हा सोशल मीडियावर कायम एक्टिव असतो. त्याचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. अभिनेता जगदीश च्या फॅमिली मध्ये आई, वडील आणि दोन बहिणी यांचा समावेश आहे. त्याने पोलीस दलात कार्य करावे, अशी त्याच्या वङिलांची इच्छा होती. मात्र जगदीशला सुरुवाती पासूनच अभिनयाची आवड होती.
आपल्या एका मुलाखतीमध्ये त्याने आपल्या करियरविषयी आणि स्वतःच्या कुटुंबाविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे देत मजेशीर खुलासे देखील केले आहेत. जगदीश कलाविश्वात येण्याआधी एका कंपनीत सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होता. तसेच त्याने काही काळ चित्रपटगृहात फ्रेंच फ्राइज आणि स्वीट कॉर्न सुद्धा विकले आहेत. परंतु नंतर त्याने शर्थीचे प्रयत्न करत अभिनयाच्या ओढीने हैदराबाद गाठले व तेथे प्रसाद स्टुडिओच्या एका शॉर्ट फिल्म मध्ये एक छोटीशी भूमिका साकार करण्याची संधी त्याला मिळाली.
२०१८ मध्ये जगदीशने Mic Tv च्या “निरुद्योग नटुलू” या कार्यक्रमात देखील काम केले होते. त्यानंतर २०१९ मध्ये तो तेलुगु वेबसिरीज “गॉङ ऑफ धर्मापुरी” यामधून सुद्धा आपला दमदार अभिनय दाखवत झळकलेला. त्यानंतर मग त्याने मागे वळून पाहिले नाही! त्याच्या प्रसिद्धीत दिवसेंदिवस वाढ होतच राहिली ती आजतागायत कायम वाढतच आहे. पुष्पा या चित्रपटानंतर जगदीशचा लवकरच “पिक पॉकेट” हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. २०२२ मध्ये त्याचा हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
केशवच्या माहिती बद्दलचा हा नाविन्यपूर्ण लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रिया नोंदवून नक्की कळवा, आम्ही असेच बॉलिवूड विश्वातील मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आमच्या या पोस्टला Like आणि Share करायला अजिबात विसरू नका!