KGF 2 च्या प्रसिद्धी पुढे अक्षरशा बॉलीवूड ने गुडघे टेकले, मोठ मोठ्या बॉलीवूड दिग्दर्शकांची पाळता भुई थोडी झाली..!

सध्या सिनेसृष्टीमध्ये बॉलीवूड पेक्षा टॉलीवूड चित्रसृष्टी चा डंका जोरात वाहताना दिसत आहे! RRR, पुष्पा या सारख्या चित्रपटांनी गेले काही महिने दणाणून सोडले आहेत. यात सध्या भर पडली आहे ती म्हणजे केजीएफ चॅप्टर 2 या सिनेमाची! साऊथ इंडस्ट्री सोबतच या चित्रपटाने बॉलिवूड देखील आपल्या आधीन केले असल्याचे दृश्य सगळीकडे पहायला मिळत आहे!! कन्नड सुपरस्टार यश याची मुख्य भूमिका असलेला, केजीएफ चाप्टर 2 या चित्रपटाचा बोलबाला सगळीकडे धूमधडाक्यात सुरू आहे!!

View this post on Instagram

A post shared by Bagalkot Yash Fc (@bagalkot_yashism)

या चित्रपटाच्या हिंदी वर्जनला बॉक्स ऑफिसवर मिळणारा एवढा प्रचंड प्रतिसाद पाहून बॉलिवूडमधील मोठमोठे दिग्दर्शक आणि निर्माते सुद्धा आता घाबरले आहेत, अशी प्रतिक्रिया काही कलाकारांकडून ऐकायला मिळत आहे.

हा सिनेमा ३५० कोटींच्या घरात पोहोचला असून त्याच्याही पुढे वाटचाल करत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ३४८.८१ कोटी रुपयांचा गल्ला जमा होण्यात यश मिळवले आहे!! या चित्रपटाने आतापर्यंत ८०० कोटींचा टप्पा पार केला आहे, त्यामुळेच केजीएफ 2 हा चित्रपट आता ‘ऑल टाइम ब्लॉकबस्टर’ सिनेमा ठरला आहे अस चित्रपट व्यापार विश्लेषक तरुण आदर्शने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यात ७५ कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे तर प्रदर्शनाच्या तिसर्‍या शुक्रवारी याचा ३५० कोटींचा टप्पा देखील पार होईल!

View this post on Instagram

A post shared by 💙falil (@leoo__messi__)

जगभरातील सिनेमा रसिकांकडून या सिनेमाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे.
या चित्रपटाने साउथ इंडस्ट्रीमध्ये आतापर्यंतचे ऐतिहासिक यश मिळवले आहे, प्रशांत निल दिग्दर्शित या चित्रपटाने बाहुबली, आर आर आर, पुष्पा यांसारख्या दमदार चित्रपटांचा रेकॉर्डही ब्रेक केला आहे आणि आता बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे विक्रम रचत आहे!

केजीएफ चॅप्टर 2 हा सिनेमा तब्बल पाच भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या पाच भाषांमधील आतापर्यंतची कमाई ५५१.८३ कोटी इतकी झाली आहे, या विकेंड मध्ये हा चित्रपट जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. हा सिनेमा के जीएफ चाप्टर 1 याचा सिक्वेल असून केजीएफ चाप्टर 2 या चित्रपटाच्या शेवटी लवकरच केजीएफ चॅप्टर 3 येणार असल्याचेही दर्शविण्यात आले आहे.यश ची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात संजय दत्त, रविना टंडन, श्रिनिधी शेट्टी, प्रकाश राज, मालविका अविनाश यांच्याही भूमिका महत्त्वपूर्ण आहेत.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप