KL राहुल ने त्याच्या टीम मधील या खेळाडूची तुलना डायरेक्ट AB डिव्हिलर्स शी केली, भारताला आता ३६० डिग्री खेळाडू मिळाला

आपण सर्वच आयपीएलचे चाहते आहोत आणि जेव्हा देशात आयपीएल सुरू होते, तेव्हा वेगळे काही विशेष उरत नाही. आयपीएल हा राष्ट्रीय स्तरावरील खेळ आहे जो दरवर्षी देशात आयोजित केला जातो. अनेक भारतीय खेळाडूंसोबतच अनेक परदेशी खेळाडूही आयपीएलमध्ये सहभागी होतात. कोरोनाच्या काळात बहुतांश खेळांचे सामने रद्द झाले होते, तेव्हाही लॉकडाऊनच्या मध्यावर यूएईमध्ये आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात आले होते आणि यावेळीही आयपीएलला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले.

या वर्षी सुद्धा IPL ला तेवढेच भरभरून प्रेम मिळत आहे कारण या वर्षी ८ नाहीत तर तब्बल १० संघ एकमेकांसमोर मैदानात उतरणार आहेत. यातच आता लखनऊ सुपर जायंट्स चा कर्णधार केएल राहुलने एका नव्या चाऱ्याची ओळख करून  दिली आहे.लखनऊ सुपर जायंट्स चा कर्णधार केएल राहुलने त्याच्या टीम मधील आयुष बडोनीचे वर्णन एक मजबूत खेळाडू म्हणून केले आहे. केएल राहुलने आयुष बडोनीला  ३६०-डिग्री खेळाडू म्हणून घोषित केले आणि त्याला भारतातील व्हाईट-बॉल क्रिकेटची संपत्ती म्हटले आहे. गुरुवारी लखनऊ पहिल्या आयपीएल विजयात या तरुणाने निर्भय खेळी खेळली.

View this post on Instagram

A post shared by Ayush Badoni (@ayush_badoni1)

केएल राहुल म्हणाला की, मी काही व्हिडिओ पाहिले आहेत जेव्हा तुम्हाला फक्त चांगले शॉट्स पाहायला मिळतात पण तो ज्या प्रकारे फलंदाजी करतो ते अप्रतिम आहे. राहुल पुढे म्हणाला की तो एक मजबूत ३६० -डिग्री खेळाडू आहे, भारतासाठी एक उत्तम खेळाडू आपल्याला भविष्यात आयुष बडोनीच्या नावाने मिळेल अशी आश्या त्याने व्यक्त केली आहे.

लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध विजय मिळवला हे लक्षात घेण्यासारखे आहे. लखनऊला गतविजेत्या CSK विरुद्ध  ६ गडी विजय मिळवण्यात यश आले. मोठ्या धावसंख्येनंतरही चेन्नईच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम खेळताना चेन्नईने ७ गड्यांच्या मोबदल्यात २१० धावा केल्या त्यामध्ये रॉबिन उथप्पाने अर्धशतक केले.

प्रत्युत्तरात खेळताना लखनऊ ने चांगली सुरुवात केली. केएल राहुल आणि डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. केएल राहुलने ४० आणि डी कॉकने ६१ धावा केल्या. नंतर एविन लुईसने२३  चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. आयुष बडोनीने ९चेंडूत नाबाद 19 धावा केल्याने लखनऊ ने हंगामातील पहिला विजय नोंदवला. या सामन्यात लखनऊ संघाने शेवटपर्यंत सामना रंजक ठेवला.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप