एकदिवसीय मालिकेत कोहली केवळ २६ धावा करू शकला, विराटच्या खराब फॉर्मवर रोहितने दिली ही प्रतिक्रिया..!

भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी ही मालिका काही खास ठरली नाही. विराट कोहलीचा वेस्ट इंडिज विरुद्धचा विक्रम इतका चांगला होता की या मालिकेत त्याच्याकडून १ शतक झळकावण्याची अपेक्षा सर्वांनाच होती. मालिकेतील पहिल्या सामन्यात कोहलीने केवळ ८ धावांचे योगदान दिले होते. दुसऱ्या सामन्यात विराट कोहली १८ धावा करून बाद झाला आणि तिसऱ्या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही.

या तीन सामन्यांच्या मालिकेत कोहलीने केवळ २६ धावा केल्या. विराट कोहलीने कर्णधारपदाचे ओझे खांद्यावरून पूर्णपणे काढून टाकले असून तो एक फलंदाज म्हणून टीम इंडियामध्ये खेळत असताना ही परिस्थिती आहे. विराट कोहलीला बऱ्याच दिवसांपासून आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. नोव्हेंबर २०१९ पासून तो शतक खेळी खेळण्यात अपयशी ठरला आहे. गेल्या ६ महिन्यांत कोहलीभोवती इतके वाद निर्माण झाले आहेत की, त्याने आधी टी-२० कर्णधारपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर त्याला एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि त्याने स्वतः कसोटीची कमान सोडली होती.

विराट कोहलीच्या फॉर्मवर भारताचा वनडे कर्णधार रोहित शर्मा काय म्हणतो ते पाहूया. रोहित शर्माला सध्या विराटच्या फॉर्मची चिंता नाही. त्याने सांगितले की, भारताच्या माजी कर्णधाराला कोणतीही अडचण नाही आणि त्याच्यावर अजूनही पूर्ण विश्वास आहे. सामना जिंकल्यानंतर पत्रकारांनी रोहित शर्माला कोहलीबद्दल विचारले असता तो म्हणाला की विराट कोहलीला कोणत्याही प्रकारचा कॉन्फिडेंस देण्याची गरज नाही. मला माहित आहे की त्याने बरेच दिवस शतक झळकावलेले नाही पण तो अर्धशतक करतोय, अगदी दक्षिण आफ्रिकेतही त्याने तीन सामन्यात दोन अर्धशतके केली होती. विराट कोहलीला कोणत्याही प्रकारच्या आत्मविश्वासाची गरज नाही आणि तो अगदी ठीक आहे. संघ व्यवस्थापनाला त्याच्या फॉर्मची अजिबात चिंता नाही.

रोहित शर्माही या मालिकेत जास्त धावा करण्यात यशस्वी ठरला नाही आणि तीन सामन्यांत त्याला केवळ ७८ धावा करता आल्या. पहिल्या सामन्यात त्याने ६० धावांची उत्कृष्ट खेळी खेळली होती पण दोन सामन्यांमध्ये तो लवकर बाद झाला. रोहित शर्मा म्हणतो की तिसऱ्या सामन्यात मधल्या फळीतील कामगिरीमुळे तो खूप आनंदी आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवनेही चांगली फलंदाजी केली आहे. प्रसिद्ध कृष्णाने गोलंदाजीवर वर्चस्व गाजवले आहे. मोहम्मद सिराजने पुन्हा एकदा चांगली कामगिरी केली आहे. दीपक चहर हा एक चांगला अष्टपैलू खेळाडू बनत आहे आणि या सगळ्याचा परिणाम येत्या १६-२० फेब्रुवारीदरम्यान कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या टी-२० मालिकेतही दिसून येईल.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप