पहिल्या बॉल आऊट झाल्यावर कोहलीने Emotional प्रतिक्रिया, त्याचे दुःख चेहऱ्यावर झळकत होते..!

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहली साठी आयपीएल २०२२ काही खास नाही. अलीकडेच सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात तो पहिल्याच चेंडू वर शून्यावर बाद झाला होता. याआधीही तो या सिजन मध्ये दोनदा शून्यावर बाद झाला आहे. यावर कोहली ने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. कोहली ने आरसीबीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, गोल्डन डकने त्याला सर्व काही दाखवले.

आरसीबी चा मिस्टर नाग्स याने कोहलीची मुलाखत घेतली होती. यादरम्यान कोहली गोल्डन डकवर म्हणाला, मला वाटते की माझ्या कारकिर्दीत असे कधीच घडले नव्हते. पण आता मी सर्व काही पाहिले आहे. या खेळाने मला सर्वकाही दाखवून दिले आहे. लोकांचा उल्लेख करत तो म्हणाला, ते मला समजत नाहीत. मला काय वाटते तेही जाणवू शकत नाहीत. ते माझे आयुष्य जगू शकत नाहीत आणि तो क्षणही ते जगू शकत नाहीत. एबी डिव्हिलियर्स च्या आठवणी बाबत तो म्हणाला, मला त्याची सतत आठवण येते. तो आता अमेरिकेत आहे आणि गोल्फ पाहत आहे. आम्ही अनेकदा मेसेज वर बोलतो.

IPL २०२२ मध्ये विराट कोहली ने ११ सामन्यात २१.६० च्या सरासरी ने २१६ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १११.९२ आहे आणि सर्वोत्तम धावसंख्या ५८ आहे. आयपीएलच्या चालू हंगामात कोहली ने २० चौकार आणि चार षटकार मारले आहेत. कोहलीची चालू हंगामातील फलंदाजी ची सरासरी २१.६० आहे. आयपीएल २००८ मधील त्याच्या पदार्पणा नंतर ची ही सर्वात वाईट सरासरी आहे. IPL २००८ मध्ये विराट कोहली ने १३ सामन्यात फक्त १५ च्या सरासरी ने १६५ धावा केल्या होत्या. त्याच वेळी २००९ च्या हंगामात कोहली ने १६ सामने खेळले आणि २२.३६ च्या सरासरी ने २४६ धावा केल्या होत्या.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप