इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १५ व्या हंगामासाठी लिलाव सुरू झाला आहे. मेगा ऑक्शनच्या पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. यादरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सने युवा फलंदाज श्रेयस अय्यरवर मोठी रक्कम खर्च केली आहे. केकेआरने अय्यरला १२.२५ कोटींना खरेदी केले आहे.
याशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला गुजरात टायटन्सने ६.२५ कोटींना विकत घेतले आहे. आयपीएल २०२१ पूर्वी तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. त्याच वेळी, श्रेयस अय्यर गेल्या मोसमापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या संघात होता. हे दोन्ही खेळाडू आता नव्या संघात खेळताना दिसणार आहेत. मेगा लिलावाच्या पहिल्या दिवशी पहिली बोली भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन वर लागली होती. त्याला पंजाब किंग्सने ८.२५ कोटींना विकत घेतले आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने ऑफस्पिनर आर अश्विनला पाच कोटी रुपयांना विकत घेतले आहे.
आयपीएलच्या शेवटच्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२१ मध्ये धवन दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. पण यावेळी तो पंजाब किंग्जशी जोडला गेला आहे. पंजाबही धवनकडे कर्णधारपद सोपवू शकतो असे मानले जात आहे. त्याचवेळी राजस्थान रॉयल्सने वरिष्ठ ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनसाठी मोठी बोली लावली होती. राजस्थानने २ कोटी बेस प्राईस असलेल्या या खेळाडूला पाच कोटी रुपयांमध्ये संघात समाविष्ट केले आहे.
कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) ७ कोटी २५ लाखांची बोली लावून विकत घेतले आहे. आफ्रिकन गोलंदाज कागिसो रबाडासाठी अनेक संघांनी बोली लावली आणि शेवटी पंजाब किंग्सने (PBKS) या वेगवान गोलंदाजाला ९.२५ कोटी रुपयांना विकत घेतले. या दोन्ही खेळाडूंची मूळ किंमत २ कोटी रुपये होती, जी बोलीमध्ये खूप महाग विकली गेली आहेत.
शिखर धवन – ८.२५ कोटी, पंजाब किंग्स
रविचंद्रन अश्विन – ५ कोटी, राजस्थान रॉयल्स
पॅट कमिन्स – ७.२५ कोटी, कोलकाता नाइट रायडर्स
कागिसो रबाडा – ९.२५ कोटी, पंजाब किंग्स
ट्रेंट बोल्ट – ८ कोटी, राजस्थान रॉयल्स
श्रेयस अय्यर – १२.२५ कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
मोहम्मद शमी – ६.२५ कोटी, गुजरात टायटन्स
फाफ डु प्लेसिस – ७ कोटी रुपये, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
क्विंटन डी कॉक – ६.७५ कोटी, लखनौ सुपर जायंट्स
डेव्हिड वॉर्नर – ६.२५ कोटी, दिल्ली कॅपिटल्स
मनीष पांडे – ४.६० कोटी, लखनौ सुपर जायंट्स
शिमरॉन हेटमायर – ८.५० कोटी, राजस्थान रॉयल्स
रॉबिन उथप्पा – २ कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
देवदत्त पडिकल – ७.७५ कोटी, राजस्थान रॉयल्स
ड्वेन ब्राव्हो – ४.४० कोटी, चेन्नई सुपर किंग्ज
नितीश राणा – ८ कोटी, कोलकाता नाईट रायडर्स
जेसन होल्डर – ८.७५ कोटी, लखनौ सुपर जायंट्स
हर्षल पटेल – १०.७५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
दीपक हुडा – ५.७५ कोटी, लखनौ सुपर जायंट्स
वानिंदू हसरंगा – १०.७५ कोटी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
वॉशिंग्टन सुंदर – ८.७५ कोटी, सनरायझर्स हैदराबाद
कृणाल पांड्या – ८.२५ कोटी, लखनौ सुपर जायंट्स
मिचेल मार्श – ६.५ कोटी, दिल्ली कॅपिटल्स