गेल्या २७ वर्षांपासून ‘ही’ व्यक्ती करत होता लता दिदींची सेवा, निधनाच्या वेळी रडून पडला होता बेशुद्ध..

लता मंगेशकर या गेल्या काही वर्षांपासून घरी एकट्याच राहत होत्या. त्यामुळेच लता मंगेशकरांच्या सेवेसाठी एका व्यक्तीची नेमणूक करण्यात आली होती.

भारताच्या गाणं कोकिळा लता मंगेशकर यांनी ६ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. निधनानंतर त्यांच्यावर शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच, बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान, आमिर खान, रणबीर कपूर असे अनेक दिगग्ज मान्यवर हजर होते. लतादीदींच्या जाण्याने संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया सगळे देत होते.

तसेच त्याठिकाणी सकाळपासून मनसेप्रमुख राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. तसेच, लता मंगेशकर यांच्या निधनानंतर संपत्तीच्या वादावरून बातम्या सुरू झालेल्या. याबरोबर त्यांना वाहण्यात येणाऱ्या श्रद्धांजली पोस्ट वरून देखील किरकोळ वाद झाले. तसेच लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून राजकारण सुरु झालेले, यावर स्वतः ह्रदयनाथ मंगेशकर यांनी स्मारकाचा वाद करू नका, असे स्पष्ट सांगितले.

आम्हाला कुठल्याही स्मारकामध्ये रस नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले. यामुळे लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा विषय तूर्तास तरी बाजूला पडेल असे वाटत आहे. लता मंगेशकर या काही वर्षांपासून त्यांच्या राहत्या घरी एकट्याच राहात होत्या. त्याकरिता लता दिदींची सेवाशुषुश्रा करण्यासाठी एका माणूस नेमण्यात आला होता. ही व्यक्ती देखील आता चर्चेत आली आहे. लता मंगेशकर यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून तो रडून रडून बेशुद्ध झाला होता.

लता दीदी जग सोडून गेल्या यावर त्याचा विश्वासच बसत नाहीये. लता दिदींची काळजी घेणाऱ्या त्यांच्या केयरटेकर चे नाव महेश राठोड असे आहे. लता दीदीचे सर्व व्यवहार देखील तोच पहायचा, असे सांगितले जाते. १९९५ मध्ये महेश राठोड कामाच्या शोधात मुंबईत आलेला. मात्र मुंबई हे मोठे आणि त्याच्यासाठी नवीन शहर असल्याने त्याला कुठे काम मिळाले नाही.

अनेक ठिकाणी त्याने कामासाठी विचारना केली, पण त्याला कुठे काहीच काम मिळालं नाही. मग एके दिवशी तो महालक्ष्मी मंदिरात बसला असताना, त्यावेळेस एका माणसाने त्याला लता मंगेशकर यांच्या घरी कामासाठी एका व्यक्तीची गरज असल्याचे सांगितले. तसेच लता मंगेशकर यांच्या घरी मला कशी काय नोकरी मिळेल असा प्रश्न त्याला पडला.पण त्या व्यक्तीने त्याला तिकडे जाण्यासाठी सांगितले. त्यामुळे, महेश राठोड हा राधा कृष्ण देशपांडे यांच्या घरी पोहचला.

त्यावेळेस राधाकृष्ण देशपांडे हे लता दीदी यांचे सर्व कामकाज बघत होते. देशपांडे यांनी त्याला लता मंगेशकर यांच्या बाबत माहिती दिली. यानंतर लता मंगेशकर यांनी महेश यांची छोटी मुलाखत देखील घेतली आणि लगेचच कामावर यायला सांगितले. त्यानंतर हळूहळू महेश याचा स्वभाव दीदींना कळत गेला. त्यानंतर तो हळूहळू दीदींना सर्व प्रकारची मदत करायला लागला.

पहिल्यांदा त्याला गाडी ड्रायव्हरची नोकरी देण्यात आली होती. परंतु त्याला गाडी चालवता येत नसल्या कारणाने तो लता दीदींची काळजी घेऊ लागला. तीन ते चार वर्षानंतर लतादिदींचा महेश हा अतिशय जवळचा व्यक्ती झाला होता. त्याने आपल्या कामामुळे लता दीदींचा विश्वास जिंकला. त्यामुळे लता दीदी त्याला आर्थिक बाबी देखील विश्वासाने सांगायच्या.

याचबरोबर लतादीदींच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन देखील तो पार पाडायचा. महेश लता दीदींच्या जेवणाची व्यवस्था देखील अगदी चोख ठेवायचा. याबरोबर लता दीदी यांना कुठले औषध द्यायचे, त्यांचे कोणते पथ्य पाळायचे या गोष्टी देखील त्याला चांगल्या प्रकारे माहित होत्या. यामुळे तो लता दीदींचा खूप आवडता आणि जवळता व्यक्ती बनला होता. विशेष म्हणजे महेश हा काही वर्षांनी ही नोकरी सोडुन देणार होता पण लता दीदींनी त्याला ही नोकरी सोडू दिली नाही.

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप