रवींद्र जडेजा दुखापती मुळे बराच काळ संघाबाहेर होता पण श्रीलंके विरुद्धच्या टी-२० मालिकेतून तो टीम इंडियात परतला आहे. येताच त्याने श्रीलंके विरुद्ध च्या दुसऱ्या टी-२० सामन्यात आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत. पण रवींद्र जडेजा इतका चांगला अष्टपैलू कसा बनला हे कोणालाच माहीत नाही. आज आपण या लेखा द्वारे रवींद्र जडेजा बद्दल जाणून घेणार आहोत.
टीम इंडियाच्या सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूं पैकी एक रवींद्र जडेजाचा जन्म १९८८ मध्ये गुजराती राजपूत कुटुंबात झाला होता. रवींद्र जडेजाच्या आईला त्याला क्रिकेटर बनवायचे होते पण आपल्या मुलाला क्रिकेटर बनवण्या आधीच तिचा मृत्यू झाला. अंडर-१९ विश्वचषकाच्या एक वर्ष आधी त्याच्या आईचे निधन झाले होते, त्या नंतर रवींद्र जडेजाने क्रिकेट पासून दूर राहण्यास सुरुवात केली होती. रवींद्र जडेजाची मोठी बहीण नयना हिने त्याला प्रोत्साहन दिले आणि कुटुंबाचीही काळजी घेतली, त्याच्या मोठ्या बहिणी मुळे रवींद्र जडेजाने पुन्हा क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.
View this post on Instagram
रवींद्र जडेजा सध्याच्या काळात टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. लहानपणी आईच्या निध’ना नंतर त्याने क्रिकेट मधून काही काळ माघार घेतली होती. पण त्याच्या मोठ्या बहिणीने त्याला भरभरून साथ दिली आणि आज त्याच्या मुळेच रवींद्र जडेजा टीम इंडियाचा चांगला अष्टपैलू खेळाडू बनला आहे. रवींद्र जडेजाच्या बालपणा बद्दल सांगायचे तर, त्याचे बालपण खूप गरिबीत गेले होते. त्याचे वडील एका खाजगी सुरक्षा एजन्सीत काम करत होते आणि त्यांना रवींद्र जडेजाला आर्मी ऑफिसर बनवायचे होते. पण रवींद्र जडेजाला क्रिकेटपटू व्हायचे होते.
टीम इंडिया साठी रवींद्र जडेजाची क्रिकेट कारकीर्द आतापर्यंत चांगलीच राहिली आहे. त्याने आता पर्यंत १६८ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यात त्याने १३ अर्धशतकांच्या मदतीने २४११ धावा केल्या आहेत आणि १८८ विकेट्स देखील घेतल्या आहेत. याशिवाय त्याने ५७ सामन्यात २१९५ धावा केल्या आहेत आणि २३२ विकेट्स ही त्याच्या नावावर आहेत. दुसरीकडे, जर आपण T-२० बद्दल बोललो तर, रवींद्र जडेजाने T-२० मध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. त्याने आता पर्यंत ५८ सामने खेळले आहेत, ज्या मध्ये त्याने ३२६ धावा देत ४८ विकेट्स घेतल्या आहेत. IPL २०२२ मध्ये, मेगा लिलावा पूर्वी रवींद्र जडेजाला CSK ने आधीच रिटेन केले होते. CSK ने त्याला सर्वाधिक रक्कम १६ कोटींना खरेदी केले आहे.