चेहऱ्यावर हात ठेवून फोटोसाठी पोज देणारी ही मुलगी आजच्या घडीला दक्षिणेतील सगळ्यात फेमस आणि टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आजच्या तारखेला सगळीकडे याच मुलीची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. कारण नुकताच तिचा एक धमाकेदार चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि त्याने बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. जिकडे पाहावं तिकडे आजकाल त्यांच्या चित्रपटातील फेमस गाणं ‘तेरी झलक अशर्फी श्रीवल्ली’ सर्वांच्याच ओठावर आलेलं दिसत आहे. निरागस चेहऱ्याच्या या चिमुकलीने आता गोव्यात एक आलिशान बंगलाही खरेदी केला असल्याचे समजत आहे.
या अभिनेत्रीच्या चाहत्यांनी तिला फोटो पाहून लगेचच ओळखले असणार. पण इतक्या हिंट देऊनही कर तुम्ही तिला ओळखले नसले तर आम्ही तुम्हाला सांगतो, ही मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून भारतीयांचा नॅशनल क्रश आणि पुष्पा स्टार रश्मिका मंदाना आहे!
रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट होऊन या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटात आपली सुपर क्युट एक्सप्रेशन क्वीन रश्मिका श्रीवल्ली च्या भूमिका निभावताना यात दिसली होती. रश्मिका मंदानाने आपल्या अभिनयाच्या जोरावर नुसतं साऊथच नव्हे तर हिंदी सिने प्रेक्षकांची मने जिंकली जिंकली आहेत!
सूत्रांच्या रिपोर्ट्सनुसार, रश्मिका मंदाना एक-दोन नव्हे तर चक्क ५ आलिशान बंगल्यांची मालकीण आहे. २०१६ मध्ये रश्मिका मंदानाने कन्नड चित्रपटात पदार्पण केले आणि सुप्रसिद्ध झाली! गीता गोविंदम, डिअर कॉम्रेड यांसारख्या दमदार चित्रपटांमधून वेगवेगळे रोल साकारणारी रश्मीका अल्पावधीत फेमस झाली आहे. कन्नड भाषेतील किरिक पार्टी हा रश्मिकाचा पहिला चित्रपट होता जो २0१६ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. यानंतर अनेक चित्रपटांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या. ज्या खुवच फेमस झाल्या तिने केलेल्या प्रत्येक चित्रपटातील भूमिकेची विशेष दखल घेऊन सगळ्यांनी कौतुक केले होते.
View this post on Instagram
आज जगात कुठेही गेली तरी तिची एक झलक पाहण्यासाठी लोक नेहमीच आतुर झालेले दिसतात. इतकेच नाही तर लवकरच रश्मिका देखील बॉलिवूड सिने इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवणार असल्याची चर्चा सिनेवर्तुळात रंगली आहे. गुडबाय नावाच्या या चित्रपटात ती अमिताभ बच्चन यांच्या सोबत स्क्रीन शेयर करताना दिसणार असल्याचे समजते!