सोशल मीडिया वरती रोज नवीन नवीन गाण्यासह वेगवेगळे ट्रेंड व्हायरल होत असतात, मध्यंतरी कच्चा बदाम हे गाणं पण फेमस झाल होतं. कच्चा बदाम गाण्याने अनेक लोकांच्या मनात विशेष जागा मिळवली होती, लोकांना हे गाणं प्रचंड आवडत असल्याने खूप जण यावर वेगवेगळे रिल ही बनवत असतात. एका बदाम विक्रेत्याकडून फेमस झालेल्या या बंगाली गाण्याची इंटरनेटवर मोठ्या प्रमाणावर क्रेझ पाहायला मिळत आहे! आतापर्यंत या गाण्यावर सर्वसाधारण लोक ते परदेशातले सेलिब्रिटी इतक्या लोकांनी यावरील गाण्यावर व्हिडीओ बनवून शेअर केले आहेत. हे गाणं गाऊन याचा मूळ गायक देखील रातोरात स्टार बनला आहे. याच कच्चा बदाम गाण्याचं सध्या वेगळं वर्जन राणू मंडल यांनी गायलेलं ऐकायला मिळत आहे. याबाबतचा राणू मंडलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, या व्हिडिओमध्ये तिने नवरीचा वेष केला असून त्यात ती कच्च्या बदाम गाणं गात आहे.
राणू मंडलचा नवा व्हिडिओ झालाय व्हायरल!: सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये राणू मंडलचा एक व्हिडीओ देखील सध्या जोरदार चर्चेत आला आहे. या व्हिडिओमध्ये तीने नवरीचा वेष केला असून कच्चा बदाम हे गाणं त्यात ती गात आहे. सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलेला हा व्हिडीओ १४ सेकंदाचा आहे, लाल रंगाची साडी आणि त्यावर नवरीच्या लूकला सूट होईल असे दागिने तिने घातले आहेत.
Kacha badam ft ranu mondal
😭😂#TejRan pic.twitter.com/ROboNTNXuA— 𝓐𝓱𝓪𝓷𝓪 𝓓 (@ahana_d9) April 13, 2022
रानुमंडल अखेर आहे तरी कोण? सोशल मीडियावर रोज कोण ना कोणतरी रातोरात स्टार बनत असतात, त्यातच राणू मंडल चे नाव ऍड करता येईल! काही काळापूर्वी ती रेल्वे स्टेशनवर ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गात असतानाचा, तिचा व्हिडिओ कोणीतरी काढला आणि रातोरात व्हायरल झाला! लोकांना राणू मंडळाचा आवाज खूप आवडला, अगदी लता मंगेशकर यांच्या आवाजात सोबत तिची तुलना करण्यात आली. या सर्व गोष्टींमुळे ती रातोरात स्टार बनली!
यानंतर तिला वेगवेगळ्या गाण्यांच्या ऑफरही आल्या, तिला एका गाण्याच्या नामांकित रियालिटी शोमध्ये देखील आमंत्रित करण्यात आलेलं! जिथे गायक आणि संगीतकार असलेला हिमेश रेशमीया याने तिला आपल्या आगामी चित्रपटात गाणं गाण्याची ऑफर देऊन टाकली. यानंतर ठरल्याप्रमाणे राणू मंडल यांनी हिमेशसह ‘तेरी मेरी कहानी’ या नावाचं गाणं गायल! ते खूपच लोकप्रिय ही झालं. परंतु त्या वेळी तिच्या मेक-अप मुळे ती खूप ट्रोल देखील झाली. सोशल मीडियावर फेमस झाल्यानंतर राणू मंडल बदलली असा अनेक लोकांचं म्हणणं पडलं.