धोनीच्या वाढदिवसा साठी विराट कोहली ने दिल्या खूपच सुंदर शुभेच्या..!

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि स्टार भारतीय फलंदाज विराट कोहली यांच्या मैत्रीबद्दल सर्वांनाच माहिती आहे. कोहलीने अनेक प्रसंगी धोनीला मोठा भाऊ म्हटले आहे. आज धोनी त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करत आहे आणि यादरम्यान कोहलीने त्याचा मोठा भाऊ धोनीसाठी एक गोंडस सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. भारतीय संघाची जर्सी आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) जर्सीमधील धोनीसोबतचे दोन फोटो शेअर करत कोहलीने लिहिले कि..

असा लीडर ज्या सारखा दुसरा कोणी नाही. तू जे रतीय क्रिकेटसाठी जे काही केले त्याबद्दल धन्यवाद. तू माझ्या मोठ्या भावापेक्षा जास्त आहेस. फक्त तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर आणि मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

धोनीच्या नेतृत्वाखाली कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले: 2008 मध्ये जेव्हा कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. धोनीच्या नेतृत्वाखाली कोहलीने अनेक सामने खेळले आहेत. धोनीने अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले, तोपर्यंत त्याने कोहलीला कर्णधारपदासाठी तयार केले होते. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली त्याला खूप मदत केल्याचेही कोहलीने कबूल केले आहे. मर्यादित षटकांचे कर्णधारपद मिळाल्यानंतरही सामन्या दरम्यान कोहली मैदानावर सतत धोनीकडून टिप्स घेत असल्याचे अनेक वेळा पाहायला मिळाले.

कर्णधार म्हणून धोनीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द अतिशय नेत्रदीपक होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने आयसीसीची तीनही विजेतेपदे जिंकली आहेत आणि असे करणारा तो जगातील पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने 2007 मध्ये प्रथम T20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2011 मध्ये भारताने क्रिकेट विश्वचषक विजेतेपद मिळवून 28 वर्षांचा दुष्काळ संपवला. 2013 मध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीवरही कब्जा केला होता. धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या आयसीसी विजेतेपदांमुळे, भारताने आतापर्यंत एकही अशी ICC ट्रॉफी नाही जी भारताने जिंकलेली नाही

सरकारी योजना, जॉब अपडेट्स व्हाट्सअप ग्रुप