सध्या साऊथचे चित्रपट वेगवेगळ्या सिनेमा घरांमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वी आलेल्या पुष्पा सिनेमाचे वादळ शमत आहे तोपर्यंतच टॉलिवूडचा सुपरस्टार यशने केजीएफ चाप्टर टू मधून भारतभर धुमाकूळ घातलाय! प्रशांत नील दिग्दर्शित ‘KGF 2’ थिएटरमध्ये त्सुनामीच्या रूपात बरसला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाईचा मान तर मिळवलाच, शिवाय सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख खान, हृतिक रोशन यांच्या सिनेमांसह ‘बाहुबली १’, ‘बाहुबली २’ आणि ‘RRR’ या चित्रपटांना देखील कमाईत मागे टाकले आहे!
या चित्रपटानेही भारतभर चांगला गल्ला कमावला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार पाहिल्यास, चित्रपटाने एस एस. राजामौलीच्या ‘RRR ‘च्या पहिल्या दिवसाच्या कमाईला देखील मागे टाकले आहे. ‘आरआरआर’ हा सुमारे ५५० कोटी रुपयांमध्ये बनवलेला चित्रपट असून ‘केजीएफ २ ‘ चित्रपटाचे बजेट केवळ दीडशे कोटी रुपये इतके आहे. . ‘
आतापर्यंत KGF Chapter 2’ या सिनेमाने त्याच्या मूळ भाषा कन्नडमध्ये सर्वात जास्त ३० कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही कन्नड चित्रपटाचा हा सर्वाधिक कमाई करणारा विक्रम बनलेला आहे. या चित्रपटाने तेलगूमध्ये सुमारे २३ कोटी रुपये, तामिळमध्ये सुमारे १२ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये सुमारे १० कोटी रुपये कमावले आहेत. दुसऱ्या दिवशी एकूण worldwide कलेक्शन (एकूण) सुमारे २७५ कोटी रुपये झाले असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
View this post on Instagram
‘KGF’ चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कलेक्शनच्या सुरुवातीच्या ट्रेंडनुसार पाहिले तर, या चित्रपटाने देशातील हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या कोणत्याही इतर सिनेमा पेक्षा सर्वाधिक कमाई केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक ओपनिंग डेचा रेकॉर्ड आतापर्यंत हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या ‘वॉर’ या चित्रपटाच्या नावावर जमा झालेला आहे, वॉर या चित्रपटाने रिलीजच्या दिवशी तब्बल ५३.२५ कोटींची कमाई केली आहे, तर ‘RRR’ हिंदी चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ १८ कोटींची कमाई करण्यात यश मिळवले आहे.
केजीएफ च्या पहिल्या भागापेक्षा केजीएफ चॅप्टर टू चित्रपट हा बॉक्स ऑफिसवर जोरदार चालणार यात काहीही शंका उरली नाहीये! मूळ कन्नड भाषेत असलेला हा चित्रपट हिंदी मध्ये देखील तितक्याच ताकदीने धुमाकूळ घालत असताना दिसत आहे, त्यात चित्रपटाला पूर्ण विकेंड मिळाल्यामुळे त्याच्या कमाई मध्ये तगडी भर दिवसेंदिवस पडतानाच दिसत आहे! अखेर आता हा चित्रपट केवढा मोठा रेकॉर्ड बनवेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे!
ज्याप्रकारे केजीएफ चॅप्टर टू चित्रपट ची घोड दौड पाहता पूर्ण पने बॉलीवूड ने त्याच्यासमोर लोटांगण घातलेला दिसत आहे. साऊथ चित्रपटा समोर सध्या तरी बॉलीवूड चा नामोनिशाण मिटताना दिसत आहे.