भारतीय आणि त्यांचे क्रिकेट प्रेम ही गोष्ट जगजाहीर आहे. अटीतटीचे रंगणारे क्रिकेटचे सामने भारतीय लोकं मोठ्या उत्साहाने पाहतात! क्रिकेटचा सामना संपल्यावर मॅच जिंकल्यावर होणारा आनंद आणि मॅच हरल्या नंतर होणारे दुःख या दोन्ही गोष्टी भारतातील क्रिकेटप्रेमी समरसून एन्जॉय करताना दिसतात. क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर बेतलेला हा सिनेमा २००१ साली आला होता.
या बहुचर्चित चित्रपटाचे नाव आहे ‘लगान’ अतिशय नाविन्यपूर्ण विषय, कथानकाची प्रभावी मांडणी, ब्रिटीशकालीन ग्रामीण भारताची वातावरण निर्मिती. या सर्व गोष्टींमुळे या चित्रपटाला अपार यश मिळाले. या सिनेमाने भारतातील अनेक पुरस्कार पटकविले व भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुर्मिळ असलेला ऑस्करच्या नामांकनासाठी देखील याची वर्णी लागलेली!
View this post on Instagram
याच ‘लगान’ सिनेमात जिने आमिरला आणि त्याच्या संघाला क्रिकेट मॅच जिंकण्यास मदत केली होती. त्या गोऱ्या नटीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात ताजी आहे. तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का की, आज तब्बल २० वर्षानंतर ती कशी दिसते?
या सिनेमातील सर्व कास्टने चित्रपट यशस्वी होण्यासाठी अपार मेहनत घेतलेली. यातली ए.आर. रहमानच संगीत लाभलेली गाणी आज ही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. यातली आमिर खानची भूमिका आजही त्याच्या करिअरमधील सर्वात चांगल्या भूमिकांपैकी एक आहे असे मानले जाते. या सिनेमात त्याने जीव ओतून काम केलं होतं. तसेच यातील आमिरची गोरी मेम (Rachel Shelley), जिने आमिरला आणि त्याच्या टिमला क्रिकेट मॅच जिंकण्यास मदत केली होती. तिची भूमिका आजही रसिक प्रेक्षक विसरले नाहीत. या लेखातून आम्ही तुम्हाला याबद्दलच माहिती देणार आहोत, तेव्हा शेवट पर्यंत नक्की वाचा!
View this post on Instagram
‘लगान’ सिनेमातील सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार आणि नैसर्गिक अभिनयाने भारतीय प्रेक्षकांच्या मनावर जादू केली म्हणूनच तर हा सिनेमा हिट झाला आणि ऑस्करपर्यंत पोहोचलेला. आजही प्रेक्षकांच्या मनात या सिनेमासाठी वेगळी जागा आहे. तसेच सिनेमात असणाऱ्या अनेक भूमिकाही फेवरेट आहेत. यातील एक भूमिका इंग्रज तरूणीची होती. एलिजाबेथ रसेल असं या भूमिकेचं नाव होतं आणि ही भूमिका साकारली होती रशेल शॅले या अभिनेत्रीने.
ही अभिनेत्री नंतर बॉलिवूडमध्ये पुन्हा दिसली नाही. आता ती कशी दिसत असेल हेही अनेकांना माहीत नाही. अशात तिचे लेटेस्ट काही फोटो समोर आले आहेत. आणि हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून लोक थक्क होत आहेत कारण, वयाच्या ५२ व्या वर्षी देखील ती लगान सिनेमात दिसत होती तशीच दिसत आहे. !
रशेलचे हे फोटो इन्स्टाग्रामवर तिच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंच्या कमेंट बॉक्समध्ये तिचे फॅन्स वेगवेगळ्या कमेंट्स अत्यंत उत्स्फूर्तपणे करत आहेत. अनेकजण हेच म्हणाले की, तिच्या वयाचा अंदाज लावणं सोपं नाही. तर काही लोकांनी तिच्या ‘लगान’मधील कामाचं पुन्हा एकदा कौतुक केलं आहे. तसेच काही लोकांच्या प्रतिक्रिया अशाही होत्या की, त्यांना तिला पुन्हा एकदा हिंदी सिनेमात बघायला नक्की आवडेल.
खरंतर हे रशेलचं ऑफिशिअल इंन्स्टाग्राम पेज नाहीये. यावरून हेच सिद्ध होत की, ती सोशल मीडियापासून दूर राहते. पण हे तिचं फॅन पेज आहे. ज्यावर तिचे वेगवेगळे फोटो शेअर करण्यात येतात. यातील अनेक फोटो लगान सिनेमाच्या वेळचे आहेत. दरम्यान रशेल व्यवसायाने एक मॉडल आणि रायटर आहे. ती ‘द एल वर्ड’ सीरिजमध्ये हेलेना पीबॉडीच्या भूमिकेसाठी ओळखली जाते.